ICC Test Rankings : टेस्ट रँकिंगमध्ये दोन खेळाडू बनले नंबर-1; रोहित शर्मा आणि बुमराहचं मोठं नुकसान
इंटरनॅशनल क्रिकेट काऊंसिल (ICC) नुकतंच आयसीसी टेस्ट रँकिंग (ICC Test Rankings) जाहीर केली आहे. जाहीर केलेल्या या रँकिंगमध्ये मोठे बदल झालेले दिसून आले.
ICC Test Rankings : इंटरनॅशनल क्रिकेट काऊंसिल (ICC) नुकतंच आयसीसी टेस्ट रँकिंग (ICC Test Rankings) जाहीर केली आहे. जाहीर केलेल्या या रँकिंगमध्ये मोठे बदल झालेले दिसून आले. टेस्ट फॉर्मेटच्या गोलंदाजी रँकिंगमध्ये यंदाच्या वेळी दोन खेळाडून नंबर-1 स्थानावर आहेत. या दोन्ही खेळाडूंचे 859 अंक असल्याने पहिल्या स्थानाचे हे दोन्ही खेळाडू आहेत. हे खेळाडू म्हणजे, टीम इंडियाचा आर अश्विन (R Ashwin) आणि इंग्लंडचा गोलंदाज जेम्स एंडरसन (James Anderson).
दोन खेळाडू बनले नंबर-1
खास बाब अशी ती म्हणजे, हे दोन्ही खेळाडूंनी वयाची 35 ओलांडली आहे आणि ते अग्रस्थानी आहे. गेल्या टेस्ट रँकिंगमध्ये 6 वर्षीय आर अश्विन (R Ashwin) ने इंग्लंडच्या जेम्स एंडरसन (James Anderson) चा नंबर एकचा ताज हिसकावला होता. मात्र आता दोन्ही खेळाडूंचे अंक समान असल्याने दोघंही पहिल्या स्थानावर आहेत. अश्विनने 2015 मध्ये पहिल्यांदा टेस्टमध्ये नंबर-1 होण्याचा सन्मान मिळवला होता.
जसप्रीत बुमराहच्या अंकांमध्ये घसरण
जवळपास गेल्या 7 महिन्यांपासून क्रिकेटच्या मैदानातून दूर असलेला जसप्रीत बुमराहच्या अंकामध्ये चांगली घसरण झाली आहे. बुमराह सध्या आठव्या स्थानावर आहे. तर पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीने बुमराहला पछाडलं आहे. ऑल राऊंडरच्या टेस्ट रँकिंगमध्येही टीम इंडियाचा रविंद्र जडेजा पहिल्या स्थानावर तर अश्विन दुसऱ्या स्थानावर आहे.
अश्विनच्या अंकांमध्ये घसरण
आयसीसीने जाहीर केलेल्या ताज्या रँकींगनुसार, नंबर वन टेस्ट गोलंदाजांची लढाई आता अधिकच रंजक बनलीये. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या टेस्ट सामन्यामध्ये अश्विनला केवळ 4 विकेट घेता आल्या. यानंतर अश्विनच्या अंकांमध्ये 6 रेटिंग गुणांची घसरण झालीये. परिणामी तो आता इंग्लंडचा गोलंदाज जेम्स अँडरसनसह 859 रेटिंग गुणांसह संयुक्तपणे पहिल्या स्थानावर आहे.
रोहित शर्माचं मोठं नुकसान
आयसीसीने जाहीर केलेल्या या क्रमवारीमध्ये टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माचं मोठं नुकसान झालेलं आहे. फलंदाजांच्या रँकिंगमध्ये ऑस्ट्रेलियाचा ओपनर फलंदाज उस्मान ख्वाजाने झेप घेतली असून तो नवव्या स्थानावर पोहोचलाय. तर रोहित शर्मा थेट टॉप-10 मधून बाहेर झाला आहे. दोन स्थानांनी घसरल्यामुळे रोहित 11 व्या क्रमांकावर पोहोचलाय. ऑस्ट्रेलियाचा मार्नस लबुशेन पहिल्या क्रमांकावर कायम असून स्मिथ दुसऱ्या तर जो रूट तिसऱ्या क्रमांकावर आहे. यामध्ये विराट कोहली फारच पिछाडीवर असून तो 20 व्या क्रमांकावर आहे.