Soft Signal Rule : इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सध्या अनेक बदल होताना दिसतायत. अशातच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या सामन्यापूर्वी आयसीसीने एक नियम रदद् करण्याचा निर्णय घेतला आहे. हा नियम इंग्लंडमध्ये होणाऱ्या भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्या सामन्यादरम्यान संपुष्टात येणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने ( ICC ) याबाबत हा मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 


कोणता आहे हा नियम?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यापूर्वी आयसीसीने अनेक नियमांमध्ये बदल केले होतं. मात्र यावेळी एक नियम थेट रद्द करण्यात आला आहे. क्रिकेटच्या मैदानावरील सॉफ्ट सिग्नलचा हा नियम अखेर संपुष्टात येणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने ( ICC ) हा नियम आंतरराष्ट्रीय सामन्यांमधून रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. हा नियम रद्द झाल्यानंतर त्यामुळे किती फरक पडतो हे पहावं लागणार आहे. आता येत्या 7 जूनपासून सुरू होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये हा महत्त्वाचा नियम लागू होणार नाहीये. 


क्रिकबझने याबाबत माहिती दिली असून त्यांच्या म्हणण्यानुसार, ICC क्रिकेटचा सॉफ्ट सिग्नल नियम (Soft Signal Rule) आता संपुष्टात येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सॉफ्ट सिग्नल नियम हटवण्याची परवानगी सौरव गांगुली यांनी दिली. गांगुली हे आयसीसीच्या मेंस क्रिकेटच्या कमेटीचे अध्यक्ष आहेत. ही कमिटी क्रिकेटच्या नियमांमध्ये बदल, नियम लागू करणं किंवा नियमांना रद्द करण्याबाबत निर्णय घेऊ शकते. 


एकंदरीत पाहिलं तर सॉफ्ट सिग्नल नियम हा वादग्रस्त ठरल्याचं अनेकदा पहायला मिळालं. क्रिकेटमधील दिग्गज व्यक्ती किंवा तज्ज्ञ मंडळींनी यापूर्वीच सॉफ्ट सिग्नल नियमाबाबत प्रश्न उपस्थित केलं होतं. इंग्लंड टीमचा कसोटी कर्णधार बेन स्टोक्सनेही या वादग्रस्त नियमावर प्रश्न उपस्थित केलं होतं. 


तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, सॉफ्ट सिग्नलचा नियम हा रद्द झाला पाहिदे. तर याबाबत थर्ड अंपायरने योग्य तो निर्णय घ्यावा. मुळात थर्ड अंपायरना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती असते. 


काय आहे सॉफ्ट सिग्नलचा नियम?


जर मैदानावरील अंपायर एखाद्या फलंदाजाला कॅच आऊट देत असेल. मात्र आणि तो कॅच संशयास्पद वाटत असल्याने अशावेळी दुसऱ्या मैदानी अंपायरशी चर्चा करून हे प्रकरण थर्ड अंपायरकडे पाठवून देतो. संबंधित कॅचच्या व्हिडिओ फुटेजमध्ये थर्ड अंपायरलाही पुरेसा पुरावा मिळाला नाही, तर मैदानी अंपायरचा निर्णय अंतिम मानला जातो.


निर्णय रद्द केल्याने काय होईल?


आता सॉफ्ट सिग्लन रूल रद्द करण्यात आल्याने संशयास्पद असलेल्या कॅच संदर्भात अंतिम निर्णय हा थर्ड अंपायरचाच असणार आहे. त्यामुळे याचा फायदा होण्याची शक्यता आहे.