भारत-पाकिस्तान टीमचा हा व्हिडिओ बनला `ट्विट ऑफ द इयर`
२०१७ हे वर्ष क्रिकेटसाठी खास राहिलं. या वर्षामध्ये अनेक नवे रेकॉर्ड बनले तर काही तुटले.
मुंबई : २०१७ हे वर्ष क्रिकेटसाठी खास राहिलं. या वर्षामध्ये अनेक नवे रेकॉर्ड बनले तर काही तुटले. २०१७च्या वर्षात पुरुषांबरोबरच महिलांच्या टीमनंही जोरदार प्रदर्शन केलं. २०१७ सालच्या १० सर्वोत्तम ट्विट्सची यादी आयसीसीनं जाहीर केली आहे. ज्या ट्विटना सर्वाधिक लाईक्स आणि रिट्विट मिळाली आहेत अशा ट्विटची ही यादी आहे.
आयसीसीच्या टॉप १० ट्विटमध्ये पहिल्या क्रमांकावर भारत आणि पाकिस्तान टीमचा व्हिडिओ. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलनंतर भारत आणि पाकिस्तानचे खेळाडू मजा-मस्ती करतानाचा हा व्हिडिओ आहे. आयसीसीनं याचा व्हिडिओ ट्विट केला होता. हा व्हिडिओ १२,४७३ वेळा रिट्विट झाला होता तर २९,००८वेळा लाईक करण्यात आला होता.
दुसरं ट्विट : आयसीसीनं ट्विट केलेला पाकिस्तान टीमचा फोटो दुसऱ्या क्रमांकावर आहे. वर्ल्ड कप, टी-20 वर्ल्ड कप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी, असं कॅप्शन देऊन आयसीसीनं हा फोटो ट्विट केला होता. या ट्विटला ७,८८६ रिट्विट आणि १४,९०१ लाईक्स मिळाले.
तिसरं ट्विट : तिसऱ्या क्रमांकावर पाकिस्तानच्या चॅम्पियन्स ट्रॉफी विजयाच्या जल्लोषाच्या व्हिडिओचं आहे.
चौथं ट्विट : युवराज सिंगचे ६ बॉल्समध्ये ६ सिक्स
पाचवं ट्विट : चॅम्पियन्स ट्रॉफीसोबत पाकिस्तान टीमचा फोटो
सहावं ट्विट : चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलमध्ये पराभव झाल्यानंतरही विराटनं पाकिस्तान टीमला दिलेल्या शुभेच्छा
सातवं ट्विट : टी-20मध्ये रोहित शर्मानं ३५ बॉल्समध्ये लगावलं शतक
आठवं ट्विट : चॅम्पियन्स ट्रॉफी विजयानंतर पाकिस्तानचं सेलिब्रेशन
नववं ट्विट : कोहली-सरफराजचं चॅम्पियन्स ट्रॉफीसोबतचं फोटो शूट
दहावं ट्विट : पाकिस्तानचा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकलेला क्षण