नवी दिल्ली : न्यूझीलंडच्या मैदानात सुरु असलेल्या अंडर-१९ क्रिकेट वर्ल्डकपमध्ये राहुल द्रविड कोच असलेली टीम जबरदस्त फॉर्मात आहे. द्रविडची कोचिंग असलेली टीम इंडियाने या संपूर्ण टूर्नामेंटमध्ये आपली विजयी घोडदौड कायम ठेवली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीममधील बॅट्समनसोबतच बॉलर्सनेही चांगली कामगिरी दाखवली आहे. पहिल्या मॅचमध्ये भारतीय टीमने ऑस्ट्रेलियाला १०० रन्सने पराभवाची धूळ चारली. तर, इतर दोन मॅचेसमध्ये १०-१० विकेट्सने विजय मिळवत नवा रेकॉर्ड बनवला. 


पहिल्या आणि तिसऱ्या मॅचमध्ये टीम इंडियाच्या विजयात मोठं योगदान होतं ते म्हणजे शुभमन गिल याचं. ऑस्ट्रेलिया विरोधात खेळताना शुभमनने ५४ बॉल्समध्ये ६३ रन्सची इनिंग खेळली. तर, झिम्बाब्वे विरोधात तुफानी बॅटिंग करत ९० रन्सची इनिंग खेळली त्यामुळे टीमला विजय मिळवता आला. 


शुभमनने आपल्या शेवटच्या सहा मॅचेसमध्ये १ सेंच्युरी आणि ३ हाफसेंच्युरी लगावल्या. या दरम्यान एकदा तो शून्यावर आऊट झाला तर एकदा बॅटिंगची संधीच मिळाली नाही. 


अंडर-१९ टीममध्ये पंजाबचा शुभमन गिल हा एक उगवता तारा आहे. २०१७मध्ये इंग्लंडमध्ये झालेल्या अंडर-१९ सीरिजमध्ये शुभमनने वन-डेमध्ये दोन सेंच्युरी लगावल्या होत्या. शुभमनने दाखवलेल्या प्रदर्शनामुळे टीम इंडियाने इंग्लंडचा ५-०ने पराभव केला होता.



शुभमनचे वडील हे एक शेतकरी आहे. त्यांना क्रिकेटची आवड आहे आणि क्रिकेटर बनण्याची त्यांची इच्छा होती. मात्र, त्यांना संधी मिळाली नाही. पण आता त्यांचं स्वप्न शुभमन पूर्ण करत आहे.


शुभमनला २०१४-१५ आणि २०१५-१६ या वर्षासाठी सर्वश्रेष्ठ बीसीसीआय अंडर-१९ क्रिकेटर हा अवॉर्ड मिळाला आहे.