U19 World Cup 2020 : `यशस्वी` खेळीच्या बळावर भारताची उपांत्य फेरीत धडक
ते आले... खेळले.... त्यांनी जिंकलं
मुंबई : ICC U19 World Cup 2020 भारतीय क्रिकेट संघ एकिकडे दमदार कामगिरी करत असतानाच त्यांच्यामागोमाग अंडर १९ क्रिकेट संघानेही त्यांच्या खेळाचं दमदार खेळाचं प्रदर्शन सुरुच ठेवलं आहे. १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत भारताचा उपांत्य फेरीमध्ये प्रवेश झाला आहे.
भारताने गतविजेत्या ऑस्ट्रेलियाला ७४ धावांनी पराभूत करत उपांत्य फेरी गाठली. अथर्व अंकोलेकर आणि यशस्वी जैस्वाल यांच्या अर्धशतकामुळे भारतानं ऑस्ट्रेलियाविरूद्ध ९ बाद २३३ धावा केल्या. सलामीची जोडी, जैस्वाल आणि सक्सेना यांनी सुरुवातीची काही षटकं धीम्या गतीने फलंदाजी केली. पण, नवव्या षटकापर्यंत त्यांनी खेळपट्टी सोडली नाही.
भारताकडून देण्यात आलेलं हे आव्हान पार करताना कार्तिक त्यागीच्या गोलंदाजीसमोर ऑस्ट्रेलियाची भंबेरीच उडाली. ऑस्ट्रेलियाचा डाव १५९ धावांत गुंडाळला गेला. ऑस्ट्रेलियाच्या सॅम फॅनिंग याने ७५ धावा करत कडवा प्रतिकार केला.
वाचा : विराट कोहलीच्या आलिशान हॉटेलमध्ये मिळतात अफलातून पदार्थ
उपांत्य फेरीत धडक मारणाऱ्या भारतीय संघाचा सामना आता चौथ्या उपांत्यपूर्व फेरीतील विजेत्या संघाशी होणार आहे. ज्यामध्ये पाकिस्तान आणि अफगाणिस्तान असे दोन संघ एकमेकांविरोधात उभे ठाकतील. तेव्हा आता येत्या काळात भारतीय क्रिकेट वर्तुळातील या नव्या जोमाच्या खेळाडूंवर अनेकांचं लक्ष असेल.