ICC Womens T20 World Cup 2024 : आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 ला गुरुवार 3 ऑक्टोबर पासून सुरुवात होणार आहे. यंदा यूएईमध्ये हा वर्ल्ड कप खेळवला जाणार असून 18 दिवसात या स्पर्धेत 23  सामने खेळवले जातील. यंदा 10 संघ यात सहभागी होणार असून 20 ऑक्टोबर रोजी महिला टी 20 वर्ल्ड कपची फायनल होईल. 6 ऑक्टोबर रोजी भारत पाकिस्तान सामना सुद्धा पार पडणार आहे. तेव्हा वर्ल्ड कपचे सामने कुठे पाहता येतील याविषयी जाणून घेऊयात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महिला टी 20 वर्ल्ड कपचं आयोजन यंदा बांगलादेशमध्ये होणार होतं. मात्र तेथे गेल्या काही दिवसात बिघडलेल्या राजकीय परिस्थितीमुळे बांगलादेश क्रिकेट बोर्डाने वर्ल्ड कपचं आयोजन यूएईमध्ये केलं आहे. दुबई आणि शारजाह येथील स्टेडियमवर हे सामने खेळवली जातील. 3 ऑक्टोबर रोजी दुपारी पहिला सामना हा यजमान बांगलादेश विरुद्ध स्कॉटलंड यांच्यात पार पडणार असून संध्याकाळी पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका यांच्यात सामना होईल. 


कधी होणार भारत - पाकिस्तान मॅच? 


महिला टी 20 वर्ल्ड कपच्या 10 संघांना ए आणि बी अशा दोन ग्रुपमध्ये विभागण्यात आले आहे. ग्रुप ए मध्ये भारत, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि श्रीलंका यांचा समावेश आहे. तर ग्रुप बी मध्ये इंग्लंड, वेस्टइंडीज, दक्षिण अफ्रीका, बांग्लादेश आणि  स्कॉटलँड यांचा समावेश आहे.  4 ऑक्टोबर रोजी महिला टी 20 वर्ल्ड कप 2024 मध्ये भारतीय महिला संघाचा पहिला सामना हा न्यूझीलंड विरुद्ध होईल. तर रविवारी 6 ऑक्टोबरला पाकिस्तान विरुद्ध टीम इंडिया मैदानात उतरेल. भारत - पाकिस्तान सामना पाहण्यासाठी क्रिकेट चाहते नेहमीच उत्सुक असतात. तेव्हा रविवारी क्रिकेट चाहत्यांसाठी ही मेजवानी असेल. 


हेही वाचा : क्रिकेटर शार्दूल ठाकूरची तब्येत बिघडली, चालू मॅच सोडून नेलं हॉस्पिटलला, नेमकं काय झालं?


 


महिला टी 20 वर्ल्ड कपमध्ये भारताचे सामने  : 


तारीख विरुद्ध सामना ठिकाण वेळ 
4 ऑक्टोबर न्यूझीलंड ग्रुप स्टेज  दुबई 7:30 PM
6 ऑक्टोबर पाकिस्तान ग्रुप स्टेज  दुबई 3:30 PM
9 ऑक्टोबर श्रीलंका ग्रुप स्टेज  दुबई 7:30 PM
13 ऑक्टोबर ऑस्ट्रेलिया ग्रुप स्टेज  शारजाह 7:30 PM

कुठे पाहता येणार सामने? 


महिला टी 20 वर्ल्ड कप 2024 चे सामने भारतीय वेळेनुसार दुपारी 3: 30 आणि सायंकाळी 7: 30  दरम्यान सुरु होणार आहेत. वर्ल्ड कपचे सर्व सामने टीव्हीवर स्टार स्पोर्ट्सवर चॅनेलवर प्रसारीत होणार असून याचे लाईव्ह स्ट्रीमिंग डिझनी प्लस हॉटस्टारवर दाखवण्यात येईल. 


महिला टी 20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ : 


हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उप कर्णधार), शफाली वर्मा, दीप्ती शर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, रिचा घोष (विकेटकिपर), यास्तिका भाटिया (विकेटकीपर), पूजा वस्त्राकर, अरुंधती रेड्डी, रेणुका सिंग ठाकूर, दयालन हेमलता, आशा शोभना, राधा यादव, श्रेयंका पाटील, सजना सजीवन