बापरे! 11 हजार जवान, बॉम्ब डिस्पोजल टीम आणि... भारत-पाकिस्तान सामन्यासाठी असा आहे प्लान
आयसीसी एकदिवसीय विश्वचचषक स्पर्धेत जगभरातील क्रिकेट चाहत्यांना उत्सुकता आहे ती भारत आणि पाकिस्तान सामन्याची. 14 ऑक्टोबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर हा सामना खेळला जाणार असून या सामन्यासाठी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.
Ind vs Pak World Cup match security: भारतात सुरुर असलेल्या आयसीसी विश्वचषक स्पर्धेत चुरशीचे सामना रंगत आहे. आतापर्यंत आठ सामने खेळवले गेले असून यजमान भारतानेही बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा पराभव करत मिशन वर्ल्ड कपची दणक्यात सुरुवात केली आहे. आता क्रिकेच चाहत्याना उत्सुकता आहे ती पारंपारिक प्रतिस्पर्धी भारत-पाकिस्तान सामन्याची (India vs Pakistan). 14 ऑक्टोबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर (Narendra Modi Stadium हा सामना रंगणार आहे. या सामन्यासाठी सुरक्षा व्यवस्थेचा खास प्लान करण्यात आला आहे.
असा आहे सुरक्षेचा प्लान
भारत-पाकिसतान सामन्यासाठी संपूर्ण अहमदाबाद स्टेडिअमल पोलीस छापणीचं रुप येणार आहे. सर्व सुरक्षा यंत्रणांचे तब्बल 11 हजार कर्मचारी शहरात तैनात करण्यात येणार आहेत. यात काऊंटर-टेरर फोर्स, नॅशनल सिक्युरिटी गार्ड (NSG), रॅपिज अॅक्शन फोर्स (RAF), होम गार्ड आणि गुजरात पोलिसांचा (Gujrat Police) समावेश असणार आहे.
7 हजार पोलीस, 4 हजार होमगार्ड
नरेंद्र मोदी स्टेडिअमची प्रेक्षक क्षमता एक लाख तीस हजार इतकी अधिक आहे. भारत-पाकिस्तान सामन्यासाठी संपूर्ण स्टेडिअम हाऊसफुल असणार आहे. सामन्याची संपूर्ण तिकिटं विकली गेली आहे. अशात कोणातीही गडबड होऊ नये यासाठी तब्बल 7 हजार पोलीस आणि 4 हजार होमगार्ड स्टेडिअममध्ये आणि स्टेडिअमच्या बाहेर तैनात असणार आहेत.
अहमदाबादच्या पोलीस आयुक्त ज्ञानेंद्र सिंह मलिक यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांशिवाय एनएसजीची तीन पथकं आणि अँटी ड्रोनचं एक पथकही तैनात असणार आहे. याशिवाय बॉम्ब निकामी पथक, NDRF आणि SDRF चे जवानांची सुरक्षाही असणार आहे. भारत-पाकिस्तान सामन्याच्या सुरक्षा व्यवस्थेबाबत गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि गृहराज्यमंत्री हर्ष संघवी यांनी उच्चस्तरीय बैठक घेतली होती. या बैठकीत सुरक्षेचा आढावा घेण्यात आला.
मोदी स्टेडिअम उडवण्यीच दिली होती धमकी
विश्वचषक स्पर्धेआधी अहमदाबाद पोलिसांना एक ई-मेलद्वारे भारत-पाकिस्तान सामन्यावेळी नरेंद्र मोदी स्टेडिअम बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाली होती. ई-मेल पाठवणाऱ्या व्यक्तीने 500 कोटी रुपयांची खंडणी मागितली होती तसंच गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या सुटकेचीही मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्था चोख करण्यात आली आहे. स्टेडिअमध्ये वादग्रस्त असतील बॅनर घेऊन जाण्यासही बंदी घालण्यात आली आहे. प्रेक्षकांच्या हातातील प्रत्येक बॅनर आणि पोस्टरची तपासणी केली जाईल.
याशिवाय गुजरातमधील संवेदनशील दरियापूर आणि जमालपूर शाहरात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. याशिवाय खेळाडूंनाही अतिरिक्त सुरक्षा पुरवली जाणार आहे.
विश्वचषकासाठी भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, सूर्यकुमार यादव, शुभमन गिल, शार्दुल ठाकुर.
विश्वचषकासाठी पाकिस्तान संघ
बाबर आजम (कर्णधार), शादाब खान (उप-कर्णधार), अब्दुल्ला शफीक, फखर जमां, हसन अली, इफ्तिखार अहमद , इमाम उल हक, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिजवान, सलमान आगा, शाहीन आफरीदी, उस्मा मीर, सऊद शकील, हारिस रऊफ, मोहम्मद वसीम जूनियर.
भारतीय संघाचं वेळापत्रक
8 ऑक्टोबर vs ऑस्ट्रेलिया, चेन्नई (भारताचा सहा विकेटने विजय)
11 ऑक्टोबर vs अफगाणिस्तान, दिल्ली
14 ऑक्टोबर vs पाकिस्तान, अहमदाबाद
19 ऑक्टोबर vs बांगलादेश, पुणे
22 ऑक्टोबर vs न्यूजीलंड, धरमशाला
29 ऑक्टोबर vs इंग्लंड, लखनऊ
2 नोव्हेंबर vs श्रीलंका, मुंबई
5 नोव्हेंबर vs साउथ अफ्रीका, कोलकाता
12 नोव्हेंबर vs नीदरलँड्स, बंगळुरु