World Cup Team of the Tournament: आयसीसी विश्वचषक 2023 स्पर्धा आता शेवटच्या टप्प्यात आहे. भारत आणि न्यूझीलंडदरम्यान (India vs New Zealand) येत्या 15 नोव्हेंबरला मुंबईच्या वानखेडे मैदानावर (Mumbai Wankhede Stadium) सेमीफायनलचा पहिला सामना खेळवला जाणार आहे. तर दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियादरम्यान (Sout Africa vs Australia) 16 नोव्हेंबरला कोलकाताच्या ईडन गार्डनमध्ये दुसरा सेमीफायनल खेळवली जाणार आहे. या दरम्यान, क्रिकेट ऑस्ट्रेलियाने विश्वचषक स्पर्धेतील सर्वोतम संघ निवडला आहे. 'टीम ऑफ द टूर्नामेंट' संघाच्या कर्णधारपदी भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीला मान देण्यात आला आहे. पण धक्कादायक म्हणजे ज्याने टीम इंडियाला सेमीफायनलपर्यंत पोहोचवलं त्या रोहित शर्माला (Rohit Sharma) बेस्ट टीममधून काढण्यात आलं आहे. रोहित शर्माने या विश्वचषक स्पर्धेत पाचशेहून अधिक धावा केल्या आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या भारतीय खेळाडूंना संधी
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने निवडलेल्या विश्वचषकाच्या सर्वोत्तम संघात सर्वाधिक चार भारतीय खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. विराट कोहलीला (Virat Kohli) संघाचा कर्णधार बनवण्यात आलं आहे. तर  रविंद्र जडेजाला ऑलराऊंडर म्हणून संघात स्थान देण्यात आलं आहे. याशिवाय भारताचे वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह यांना प्रमुख वेगवान गोलंदाज म्हणून संघात स्थान मिळालं आहे. वर्ल्ड कपच्या सर्वोत्तम संघात सलामीच्या फलंदाजीची जबाबदारी ऑस्ट्रेलियाचा आक्रमक फलंदाज डेव्हिड वॉर्नरला देण्यात आली आहे. 


दक्षिण आफ्रिकेचे 3 खेळाडू
या संघात ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेच्या प्रत्येकी 3 खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. दक्षिण आफ्रिकेच्या क्विंटन डिकॉक, अॅडन मारक्रम आणि मार्को यानसेन यांना संधी देण्यात आलीय. क्विंटन डिकॉक आणि मारक्रम यंदाच्या विश्वचचषकात जबरदस्त फॉर्मात आहेत. डिकॉकने या स्पर्धेता आतापर्यंत तब्बल 4 शतकं केली आहे. तर मार्को यानसेन या स्पर्धेतला टॉप विकेट टेकर आहे. त्याने तब्बल 17 विकेट घेतल्या आहेत.


ऑस्ट्रेलियाचा तीन खेळाडू
ऑस्टेलियाच्या तीन मॅचविनर खेळाडूंना या संघात संधी देणयात आली आहे. यात डेव्हिड वॉर्नरकडे सलामीच्या फलंदाजीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर ऑलाऊंडर ग्लेन मॅक्सवेललाही संघात संधी देण्यात आली आहे. मॅक्सवेलने अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात 201 धावांची नाबाद ऐतिहासिक खेळी केली होती. दुखापतीवर मात करत मॅक्सवेलने केलेली ही खेळी क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम खेळी ठरली आहे. याशिवाय ऑस्ट्रेलियाच्या अॅडम झम्पालाही फिरकी गोलंदाज म्हणून निवडण्यात आलंय. झम्पाने विश्वचषकात आतापर्यंत 22 विकेट घेतल्या आहेत. 


न्यूझीलंड-श्रीलंकेचा एक खेळाडू
यंदाच्या विश्वचषकात सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय ते न्यूझीलंडचा युवा फलंदाज रचिन रविंद्रने. या स्पर्धेत रचिनने तब्बल 3 शतकं केली आहेत. तर श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज दिशान मधुशंकालाही संधी देण्यात आली आहे. मधुशंकाला बारावा खेळाडू म्हणून संधी देण्यात आली आहे. मधुशंकाने या विश्वचषकात 21 विकेट घेतल्यात.