Hotel Rent In Ahmedabad : भारतात गेल्या दीन महिन्यापासून सुरु असलेली आयसीसी विश्वचषक स्पर्धा (ICC World Cup 2023) आता शेवटच्या टप्प्यात आहे. स्पर्धेत सहभागी झालेल्या दहा संघांपैकी आता केवळ संघ उरलेत. येत्या रविवारी म्हणजे 19 नोव्हेंबरला भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान (India vs Australia Final) आयसीसी विश्वचषकाचा अंतिम सामना खेळवला जाणार आहे. जगभरातील क्रिकेटप्रेमींची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. ऑस्ट्रेलिया सहाव्यांदा विश्वचषकावर नाव कोरणार की टीम इंडिया तिसऱ्यांदा विश्वचषक पटकावणार याकडे संपूर्ण क्रिकेट जगताचं लक्ष लागलं आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर (Narendra Modi Stadium) विश्वचषकाचा अंतिम सामना खेळवला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार येत्या रविवारी दुपारी दोन वाजता अंतिम सामन्याला सुरुवात होईल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अहमदाबादमध्ये हॉटेलचं भाडं लाखोच्या घरात
अंतिम सामन्या पाहण्यासाठी देश-विदेशातील लाखो चाहते अहमदाबादमध्ये दाखल व्हायरला सुरुवात झालीय. या पार्श्वभूमीवर अहमदाबादमध्ये हॉटेलच्या किंमती (Hotel Rent High) लाखोंच्या घरात पोहचल्या आहे. ज्या हॉटेलमध्ये एका दिवसाचं भाडं 20 हजार रुपये इतकं होतं, त्या रुमचं भाडं सवा लाख रुपयांपर्यंत गेलंय. 'फेडरेशन ऑफ होटल अँड रेस्टोरेंट असोसिएशन ऑफ गुजरात'चे अध्यक्ष नरेंद्र सोमानी यांनी ही माहिती दिलीय. 


टीम इंडिया फायनलमध्ये पोहोचल्यने देशात उत्साहाचं वातावरण आहे. शिवाय विदेशात राहाणाऱ्या भारतीयांमध्येही फायनलची क्रेझ आहे. दुबई, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिकेहून क्रिकेट चाहते अंतिम सामना पाहण्यासाठी अहमदाबादमध्ये दाखल होतायत. भारत फायनलमध्ये पोहोचतात अहमदाबादमध्ये हॉटेलच्या रुमचं भाडं तिपटीने वाढलंय. हॉटेलच्या वेबसाईटवरही वाढलेल्या किंमती दिसतायत.


अहमदाबादमधल्या नरेंद्र मोदी स्टेडिअमची प्रेक्षक क्षमता सवा लाखाहून अधिक आहे. अहमदाबाद आणि आसपासच्या राज्यातील प्रेक्षकांची संख्या जास्त असेल. पण 30 ते 40 हजार प्रेक्षक बाहेरुन येतील. या सर्वांच्या राहाण्याची व्यवस्था अहमदाबादमध्ये करण्याचं आव्हान असल्याचं नरेंद्र सोमानी म्हटलंय. अहमदाबादमध्ये सर्व हॉटेलमध्ये मिळून पाच हजारांच्या आसपास रुम आहेत. तर संपूर्ण गुजरातमध्ये थ्री ते फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये दहा हजार रुम आहेत. ही संख्या अपूर्ण आहे. त्यामुळे अहमदाबादच्या आसपासच्या छोट्या छोट्या गावातील हॉटेलमधील रुमही फूल झाले आहेत.  


मुंबईहून अहमदाबादसाठी विशेष ट्रेन
रविवारी अहमदाबाद इथं होणारा क्रिकेट विश्वचषक अंतिम सामना पाहण्यासाठी मध्य रेल्वे क्रिकेटप्रेमी प्रवाशांसाठी क्रिकेट विश्वचषक विशेष ट्रेन चालवली जाणार आहे. ट्रेन क्रमांक 01153 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- अहमदाबाद विशेष एक्स्प्रेस 18/11/2023 रोजी 
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथून 22.30 वाजता सुटेल आणि अहमदाबाद येथे दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी सकाळी 6.40 वाजता पोहोचेल. 


ट्रेन क्रमांक 01154  दिनांक 20/11/2023 रोजी अहमदाबाद - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष एक्स्प्रेस अहमदाबाद इथून  (रविवार/सोमवारच्या मध्यरात्री) 1.45 वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथं त्याच दिवशी (सोमवार) सकाळी 10.35 वाजता  पोहोचेल. 


थांबे:  छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, ठाणे, वसई रोड, सुरत, वडोदरा आणि अहमदाबाद