India vs New Zealand World Cup Semi Final 2023: बाप का, दादा का, भाई का...सबका बदला लेगा रे तेरा फैजल... बॉलिवूडमध्ये सुपरहिट ठरलेल्या गँग्स ऑफ वासेपूर-2 चित्रपटातील हा प्रसिद्ध डायलॉग. क्रिकेटमध्ये हा डायलॉग भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मासाठी (Rohit Sharma) अगदी चपखल बसतो. विश्वचषक स्पर्धा 2023 मध्ये भारतीय संघाने दमदार कामगिरी करत सेमीफायनलमध्ये (World Cup Semifinal) एन्ट्री केली आहे. सेमीफायनलमध्ये टीम इंडियाची गाठ न्यूझीलंडशी (India vs Semifinal) होणार हे जवळपास निश्चित झालंय. याच न्यूझीलंड संघाने 2019 विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाला हरवत विश्वचषकाच्या बाहेरचा रस्ता दाखवला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रोहित शर्मा बदला घेणार
2019 विश्वचषक स्पर्धेतील पराभवाचा बदला रोहित शर्माची टीम इंडिया (Team India) घेणार का याची उत्सुकता क्रिकेटप्रेमींना लागलीय. 'धोनी का, 2019 का, मैनचेस्टर का, सबका बदला लेगा हमारा रोहित' असा डायलॉग सेमीफानयनलआधी व्हायरल झाला आहे. याला कारणही तसंच आहे. यंदाचा भारतीय संघ जबरदस्त फॉर्मात आहे. गोलंदाजी आणि फलंदाजी प्रत्येक सामन्यागणिक दमदार होतेय. फलंदाजीत कर्णधार रोहित शर्मा, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, के एल राहुल पुरुन उरतायत. तर गोलंदाजीत मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज हे वेगवान त्रिकुट कर्दनकाळ ठरतंय. फिरकीत कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजासमोर विरोधी संघ हतबल होताना दिसतोय.


ग्रुप स्टेजमध्ये न्यूझीलंडचा पराभव
ग्रुप स्टेजमध्ये भारत आणि न्यूझीलंडदरम्यान एक सामना खेळवण्यात आला होता. या सामन्यात न्यूझीलंडने 274 धावांचं दिलेलं आव्हान 48 षटकात आणि 6 विकेटच्या मोबदल्यात पूर्ण केलं होतं. हिमाचल प्रदेशच्या धरमशालात खेळवण्यात आलेला या सामन्यात पूर्णपण टीम इंडियाचं वर्चस्व होतं.


सेमीफायनलमध्ये आमने सामने
आता भारत आणि न्यूझीलंड संघ पुन्हा एकदा सेमीफायनलमध्ये आमने सामने येणार आहेत. दिवाळीनंतर म्हणजे 15 नोव्हेंबरला मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर पहिली सेमीफायनल खेळवली जाणार आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माचं हे होमग्राऊंड आहे. याच मैदानावर 2011 विश्वचषकात भारताने श्रीलंकेचा 55 धावांनी पराभव करत विश्वचषकावर दुसऱ्यांदा नाव कोरलं होतं. आता पुन्हा एकदा याच मैदानावर रोहितसेना मोठा धमाका करण्यासाठी सज्ज झालीय.


सेमीफायनलचं समीकरण


पहिली सेमीफाइनल
भारत Vs न्यूजीलैंड (पाकिस्तानने मोठा चमत्कार केला नाही तर)   -   मुंबई (वानखेडे स्टेडियम)  - 15 नोव्हेंबर


दूसरी सेमीफाइनल
दक्षिण आफ्रीका Vs ऑस्ट्रेलिया   -   कोलकाता (ईडन गार्डन्स)  - 16 नोव्हेंबर


वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघ 
रोहित शर्मा (कर्णधाक), विराट कोहली, जसप्रीत बुमराह, शुभमन गिल, केएल राहुल, श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, ईशान किशन, सूर्यकुमार यादव, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, प्रसिद्ध कृष्णा, रविचंद्रन अश्विन आणि शार्दुल ठाकुर.


वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंड संघ 
केन विलियमसन (कर्णधार), ट्रेंट बोल्ट, मार्क चॅपमैन, डेवोन कॉन्वे, लॉकी फर्ग्यूसन, मैट हेनरी, टॉम लैथम (उपकर्णधार/विकेटकीपर), डेरिल मिचेल, जिमी नीशम, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, मिचेल सेंटनर, ईश सोढी, टिम साउदी आणि विल यंग.