World Cup 2023 मधील भारत-पाक सामन्याबद्दल मोठी Update; पाहून म्हणाल आता काही खरं नाही...
ICC Cricket World Cup 2023 : आयपीएल सामने उरकल्यानंतर संघातील अनेक खेळाडू भविष्यातील सामन्यांसाठी तयारीला लागणार आहेत. त्यातच संघासाठी बीसीसीआयसुद्धा तयारीला लागल्याचं दिसत आहे.
ICC Cricket World Cup 2023 : आयपीएलची धूम संपल्यानंतर भारतीय क्रिकेट संघ WTC च्या तयारीला लागेल, तर काही खेळाडू भविष्यातील स्पर्धांसाठी तयारी करताना दिसतील. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सध्याच्या घडीला भारतीय संघाची एकंदर कामगिरी पाहता संघानं 2023 मधील विश्वचषकावर नाव कोरावं अशीच क्रिकेटप्रेमींचीही अपेक्षा आहे. किंबहुना भारतीय संघाला सर्वतोपरी पाठींबा देण्यासाठी आता बीसीसीआयसुद्धा प्रयत्न करताना दिसत आहे. मग तो क्रिकेटप्रेमींच्या पाठिंब्याच्या रुपात का असेना.
क्रिकेट विश्वातील सर्वात मोठी Update
सध्याच्या घडीला संपूर्ण विश्वचषक स्पर्धेमध्ये भारतीय क्रिकेटप्रेमींचा एकच प्रश्न आहे, तो म्हणजे भारत आणि पाकिस्तानमधील सामना नेमका कुठे खेळवला जाणार? तर, तणावाची परिस्थिती पाहता हे सामने पाकिस्तानात होणार नसल्याचं यापूर्वीच स्पष्ट झालं. ज्यानंतर गुजरातच्या अहमदाबाद येथील नरेंद्र मोची स्टेडियमनं India vs Pakistan सामन्याचं आयोजन करणासाठी इच्छुकांच्या यादीत बाजी मारल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, सध्या इथंची चित्र स्पष्ट झालं असून, आता याच स्टेडियममध्ये भारत-पाक सामना खेळवला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.
हेसुद्धा वाचा : विराटआधी Gautam Gambhir नं धोनीलाही डिवचलेलं? Team India तील खेळाडूचा गौप्यस्फोट
BCCI कडून या हाय व्होलटेज सामन्यासाठी देशोदेशीच्या क्रिकेटप्रेमींची हजेरी असणार असल्याची वस्तुस्थिती पाहता हा सामना 1 लाख प्रेक्षकांची बैठक व्यवस्था असणाऱ्या अहमदाबादच्या मोदी स्टेडियममध्ये आयोजित करण्याचा निर्णय घेतल्याचं कळत आहे.
नियोजित कार्यक्रमातून बीसीसीआय करणार मोठी घोषणा...
सध्या सुरु असणारी आयपीएल स्पर्धा संपल्यानंतर BCCI कडून एका दिमाखदार सोहळ्यामध्ये विश्वचषकाबाबतची सविस्तर माहिती देण्यात येईल. दरम्यान, सध्याच्या घडीला सुरु असणाऱ्या सर्व क्रिकेट स्पर्धा नियोजित वेळापत्रकानुसार पार पडल्यास 5 ऑक्टोबर 2023 पासून क्रिकेट विश्वचषकाची सुरुवात होणार आहे. ज्यामध्ये मुंबई, इंदुर, बंगळुरू, त्रिवेंद्रम, धरमशाला, नागपूर, बंगळुरू, लखनऊ, धरमशाला, राजकोट, कोलकाता आणि देशातील इतर स्टेडियमची नावंही यादीत समाविष्ट करण्यात आली आहेत. ज्यापैकी सात स्टेडियममध्येच league सामने पार पडणार आहेत. अहमदाबादच्याच स्टेडियममध्ये संघाला दोन सामने खेळण्याची संधी मिळू शकते, पण त्यासाठी संघाला विश्वचषकाच्या अंतिम सामन्यापर्यंत मजल मारावी लागणार आहे.
सुरक्षिततेच्या कारणास्तव पाकिस्तान या स्पर्धेदरम्यान सर्वाधिक कामने चेन्नई आणि बंगळुरू येथे खेळणार असल्याचं सांगण्यात येत आहे. या सामन्यांसाठी कोलकात्यातील स्टेडियमचाही पर्याय नजरेत घेण्यात येत आहे. तर, बांग्लादेशचे सर्वाधिक सामने गुवाहाटी आणि कोलकात्यात खेळवले जाणार आहेत. इथं लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे ऑक्टोबर महिन्यात देशात मान्सूनची परिस्थिती पाहता त्या अनुषंगानंही सामन्यांचं आयोजन करण्यात येणार आहे.
The Kerala Story