ICC World Cup India vs Pakistan : आयसीसी विश्वचषचक स्पर्धेत करोडो क्रीडाप्रेमींना उत्सुकता असलेला भारत-पाकिस्तान (India vs Pakistan) सामना शनिवारी म्हणजे 14 ऑक्टोबरला खेळवला जाणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर (Narendera Modi Stadium) हा सामना रंगणार आहे. भारत आणि पाकिस्तान संघाने पहिले दोन सामने जिंकत दणक्यात सुरुवात केली आहे. भारताने ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानचा तर पाकिस्तानने नेदरलँड आणि श्रीलंकेचा पराभव करत पॉईंटटेबलमध्ये टॉप फोरमध्ये जागा पटकावली आहे. आता विजयाची हॅटट्रीक करण्यासाटी दोनही संघ सज्ज झाले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विमानतळावर भव्य स्वागत
तिसऱ्या सामन्यासाठी दोनही संघ अहमदाबादमध्ये (Amhedabad) दाखल झालेत. सात वर्षांनंतर भारतीय भूमीत पाय ठेवलेल्या पाकिस्तान संघाचं हैदराबाद विमानतळावर चाहत्यांनी जोरदार स्वागत केलं होतं. त्यानंतर आता अहमदाबादम विमानतळावरही पाकिस्तानी संघाचं भव्य स्वागत करण्यात आलं. विमानतळावर पाकिस्तान खेळाडूंसाठी फुलं उधळण्यात आली. ढोल-ताशांच्या गजरात त्यांचं स्वाग करण्यात आलं. इतकंच नाही तर गुजरातच्या पारंपारिक गरबा नृत्याचंही स्वागतासाठी आयोजन करण्यात आलं होतं. या स्वागताने बाबर आझमची सेना भारावून गेली. 


शिवसेनेची टीका
पण पाकिस्तान क्रिकेट संघाच्या या स्वागतावरुन शिवसेना खासदार प्रियंका चतुर्देवी यांनी नाराजी व्यक्त केली आहे.  पाकिस्तानी संघाचं फुल उधळत स्वागत म्हणजे आपल्या शूर शहीदांच्या आणि दहशतवादाला बळी पडलेल्यांच्या कुटुंबियांची चेष्टा असल्याचं प्रियंका चतुर्वेदी यांनी म्हटलं आहे. प्रियंका चतुर्वेदी यांनी बीसीसीआयवरही टीका केली आहे. 


world cup, icc world cup 2023, Pakistan Cricket Team In India, Pakistan Team Welcome, Priyanka Chaturvedi, India vs Pakistan, Narendra Modi Stadium, Ahmedabad Airport, Pakistan Team Welcom in Ahmedabad Airport

पाकिस्तान संघाचा जल्लोष
दरम्यान, श्रीलंकेविरुद्धच्या ऐतिहासिव विजयानंतर पाकिस्तानी संघाने जल्लोष साजरा केला. श्रीलंकेने विजयासाठी दिलेलं 345 धावांचं आव्हान पूर्ण करत विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात पाकिस्तानने हायेस्ट स्कोर चेसचा विक्रम केला. हैदराबादच्या राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडिअमवर पार पडलेल्या या सामन्यात पाकि्सतानने श्रीलंकेचा 6 विकेटने पराभव केला. पाकिस्तानच्या विजयाचा हिरो ठरला तो मोहम्मद रिझवान. रिझवानने 121 चेंडूवर नाबाद 131 धावांची विजयी खेळी केली. तर अब्दुल्ला शफीकने 113 धावांची खेळी करत रिझवानला चांगली साथ दिली.  


आता भारताविरुद्धच्या सामन्यासाठी पाकिस्तानचा संघ अहमदाबादमध्ये दाखल झाला आहे. विश्वचषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान संघ आतापर्यंत सातवेळा आमने सामने आले आहेत. आणि सातही वेळा भारताने पाकिस्तानला धुळ चारली आहे. आता अहमदाबादमध्ये विजयाची ही परंपारी भारतीय संघ कायम ठेवणार की पाकिस्तान विश्वचषकात भारताविरुद्ध पहिल्या विजयाची नोंद करणार याकडे क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागलं आहे.