ICC Cricket World Cup 2023: आयसीसी विश्वचषक स्पर्धा आता शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे. प्रत्येक सामना सेमीफायनलच्यादृष्टीने (World Cup Semifinal) महत्त्वाचा ठरतोय. सेमीफायनलमध्ये कोणते चार संघ प्रवेश करणार याची उत्सुकता जगभरातील क्रिकेटप्रेमींना लागलीय. दहा संघांपैकी भारत आणि दक्षिण आफ्रिकेचं सेमीफायनलमधलं स्थान जवळपास निश्चित मानलं जात आहे. तर उरलेल्या दोन जागांसाठी अजूनही जबरदस्त चुरस आहे. अशात एक मोठी बातमी समोर आली आहे. बाबर आझमच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या पाकिस्तानने एक विक्रम आपल्या नावावर केला आहे. पाकिस्तान संघाने (Pakistan) भारत आणि दक्षिण आफ्रिकेला मागे टाकत अव्वल स्थान पटकावलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तान संघ बनला नंबर वन
यंदाच्या आयसीसी विश्वचषक स्पर्धेत (ICC World Cup 2023) पाकिस्तानची कामगिरी फारशी समाधानकारक झालेली नाही. आतापर्यंत खेळलेल्या सात सामन्यात पाकिस्तान संघाला केवळ तीन सामने जिंकता आलेत. तर चार सामन्यात पराभव पत्करावा लागलाय. पाकिस्तानची फलंदाजी आणि जगात लय भारी मानली जाणारी गोलंदाजीही सुमार झाली आहे. इतकंच काय तर क्षेत्ररक्षणातही पाकिस्तान संघ कधीच चांगला नव्हता. पाकिस्तानच्या क्षेत्ररक्षणाचे किस्से क्रिकेट विश्वात प्रसिद्ध आहे.


पण यंदाच्या विश्वचषकात अशक्य गोष्ट शक्य झाली आहे. पाकिस्तानच्या नावावर चांगल्या क्षेत्ररक्षणाचा (Fielding) विक्रम जमा झाला आहे. यंदाच्या विश्वचषकात सर्वाधिक झेल घेणाऱ्या संघात पाकिस्तान अव्वल स्थानावर आहे. याबाबतीत पाकिस्तानने भारत आणि दक्षिण आफ्रिकेलाही मागे टाकलं आहे. यंदाच्या विश्वचषकात आतापर्यंत खेळलेल्या 33 सामन्यांचा हा रेकॉर्ड काढण्यात आलाय. या रेकॉर्डनुसार पाकिस्तानने आतापर्यंत खेळेलेल्या सामन्यात 37 झेल टिपले आहेत. तर 6 झेल सोडले आहेत. फिल्डिंगमध्ये पाकिस्तानचा अॅव्हरेज 86 टक्के आहे. पाकिस्ताननंतर दुसऱ्या क्रमांकावर नेदरलँड संघाचा नंबर लागतो. नेदरलँडने 33 झेल टिपलेत तर 6 झेल सोडले आहेत.


तिसऱ्या क्रमांकावर 81 टक्क्यांसह भारताचा नंबर लागतो. टीम इंडियाने 25 झेल टिपलेत, तर 6 झेल सोडलेत. चौथ्या क्रमांकावर असलेल्या इंग्लंडने 6 झेल सोडलेत. पाचव्या क्रमांकावर असलेल्या दक्षिण आफ्रिकेने 12 झेल सोडलेत. बांगलादेश सहाव्या क्रमांकावर असून त्यांनी  26 झेल टिपलेत तर  8 झेल सोडलेत. सातव्या क्रमांकावर असलेल्या ऑस्ट्रेलियाने तब्बल 12 झेल सोडेलत. तर आठव्या क्रमांकावर असलेल्या अफगाणिस्तानने 20 झेल पकडलेत तर 8 झेल सोडलेत. या यादीत नवव्या क्रमांकावर न्यूझीलंड असून त्यांनी 16 झेल सोडलेत. तर शेवटच्या म्हणजे दहाव्या क्रमांकावर असलेल्या श्रीलंकेने 22 झेल पकडलेत तर 14 झेल सोडलेत.


पॉईंटटेलमध्ये द.आफ्रिका नंबर वन
पॉईंटटेबलमध्ये दक्षिण आफ्रिका पहिल्या स्थानावर आहे. दक्षिण आफ्रिकेने सात सामन्यात सहा विजय मिळवलेत. त्यांच्या खात्यात 12 पॉईंट जमा आहेत. तर टीम इंडियाच्या खात्यातही 12 पॉईंट आहेत. पण नेट रन रेटच्या आधारावर दक्षिण आफ्रिका अव्वल आहे.