World cup 2023 Pakistan : आयसीसी विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तान क्रिकेट संघाची कामगिरी सुमार होतेय. बाबर आझमच्या (Babar Azam) नेतृत्वाखाली खेळणाऱ्या पाकिस्तानला चार सामन्यांपैकी दोन सामन्यात पराभव पत्करावा लागलाय. विश्वचषक पॉईंटटेबलमध्ये (World Cup Pointatble) पाकची  पाचव्या स्थानावर घसरण झाली असून सेमीफायनलचा मार्गही आणखी कठिण बनला आहे. जगातील टॉपचा क्रिकेटपटू बाबर आझम या स्पर्धेत फ्लॉप ठरतोय. आश्चर्यकारक म्हणजे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तान संघाच्या उपकर्णधारालाच प्लेईंग इलेव्हनमधून बाहेर बसवण्यात आलं होतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उपकर्णधारच बाहेर
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तान संघाचा उपकर्णधार शादाब खानला (Shadab Khan) प्लेईंग इलेव्हनमध्ये संधी देण्यात आली नाही. शादाबच्या जागी लेग स्पीनर उसामा मीरला संघात संधी देण्यात आली. पण हा निर्णय चांगलाच महागात पडला. उसमा मीरने 9 षटकात 1 विकेट घेत तब्बल 82 धावा दिल्या. सर्वात महत्वाचं म्हणजे उसामाने डेव्हिड वॉर्नरचा झेल सोडला. हा झेल पाकिस्तानला चांगलाच महागात पडला. वॉर्नर 10 धावांवर खेळत असताना शाहिन आफ्रिदीच्या गोलंदाजीवर उसामाने दहा धावांवर खेळणाऱ्या उसामाचा सोपा झेल सोडला. यानंतर वॉर्नरने 163 धावा केल्या. या जोरावर ऑस्ट्रेलियाने 367 धावांचा डोंगर उभा केला. 


बाबर आझम ठरतोय फ्लॉप
पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला विश्वचषकात अद्यापही सूर सापडलेला नाही. या स्पर्धेत आतापर्यंत खेळवलेल्या चार सामन्यात बाबरने केवळ 83 धावा केल्या आहेत. यात भारताविरुद्धच्या 50 धावांच्या खेळीचा समावेश आहे. शोएब मलिक आणि मोईन खान या पाकिस्तानच्या दिग्गज खेळाडूंनी बाबर आझमच्या कामगिरीवच प्रश्न उपस्थित केला आहे. विश्वचषकाच्या सराव सामन्यात बाबर आझमने तुफान कामगिरी केली होती. न्यूझीलंडविरुद्ध 80 तर ऑस्ट्रेलियाविरुद्ध 90 धावा केल्या होत्या. त्यामुळे पाकिस्तानी चाहत्यांना बाबर आझमकडून मोठ्या अपेक्षा होत्या. पण अद्यापही त्याला सूर सापडलेला नाही. त्यामुळे बाबरलाही प्लेईंग इलेव्हनमधून बाहेर करणार का असा प्रश्न विचारला जातोय.


बाबरची विश्वचषकातील कामगिरी
6 ऑक्टोबर : VS नेदरलँड - 5 धावा
10 ऑक्टोबर : VS श्रीलंका - 10 धावा
14 ऑक्टोबर : VS भारत - 50 धावा
18 ऑक्टोबर : VS ऑस्ट्रेल‍िया- 18 धावा


पाकिस्तान सेमीफायनलमध्ये पोहोचणार?
चार सामन्यातील दोन पराभवांमुळे पाकिस्तानचा संघ पॉईंटटेबलमध्ये पाचव्या स्थानावर घसरला आहे. तर ऑस्ट्रेलिया संघ चौथ्या क्रमांकावर पोहोचलाय. सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियासाठी आता पुढचा प्रत्येक सामना महत्त्वाचा असणार आहे. एका सामन्यातील पराभवही दोनही संघांना महागात पडणार आहे.