VIDEO: वर्ल्ड कपआधी हे काय? ऋषभ पंतवर का आली बकऱ्या चारण्याची वेळ, चाहत्यांना धक्का
ICC Wordl Cup 2023 : क्रिकेट विश्वचषक स्पर्धेला सुरुवात झाली आहे. एकीकडे क्रिकेटप्रेमींमध्ये उत्साह असताना एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमुळे क्रिकेट चाहत्यांमध्ये संभ्रम पसरला आहे. या व्हिडिओत दुखापतग्रस्त ऋषभ पंत चक्क बकऱ्या चरताना दिसत आहे.
ICC Wordl Cup 2023 : आयसीसी एकिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेला सुरुवात झाली आहे. पुढचे 46 दिवस जगभरातील क्रिकेट प्रेमींना रंगतदार क्रिकेट सामन्यांची मेजवानी मिळणार आहे. यंदा भारत या स्पर्धेचा आयोजक देश असल्याने भारतीय क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली टीम इंडिया (Team India) तिसऱ्यांदा विश्वचषकावर नाव कोरण्यासाठी मैदानावर उतरणार आहे. .टीम इंडियाच्या मिशन वर्ल्ड कपला (Mission World Cup) 8 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. चेन्नईच्या चिदम्बरम स्टेडिअमवर भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान (India vs Australia) सामना रंगणार आहे.
क्रिकेट चाहत्यांना धक्का
विश्वचषक स्पर्धेत यंदा भारतीय विजेतापदाचा मजबूत दावेदार मानला जातोय. त्यामुळे एकिकडे भारतीय क्रिकेट चाहत्यांमध्ये जबरदस्त उत्सुकता असताना, दुसरीकडे एक व्हिडिओ समोर आला असून या व्हिडिओमुळे क्रिकेट चाहत्यांना धक्का बसला आहे. बीसीसीआयने (BCCI) आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत भारताचा स्टार क्रिकेटर ऋषभ पंत (Rishabh Pant) चक्क बकऱ्या चारताना दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नेमंक काय घडलं याबाबत क्रिकेट चाहत्यांचा मनात संभ्रम पसरला आहे.
30 डिसेंबर 2022 रोजी ऋषभ पंतच्या कारला भीषण अपघात झाला होता. दिल्लीवरुन रुरकीला आपल्या घरी जाताना पहाटे त्याच्या कारला अपघात झाला. सुदैवाने या अपघातातून ऋषभ पंत बचावला. पण त्याच्या पायाला दुखापत झाली. यानंतर गेले वर्षभर ऋषभ पंत क्रिकेटपासून दूर आहे. त्यामुळे फावल्या वेळेत ऋषभ पंतने बकऱ्या चारण्याचा व्यवसाय सुरु केला का? असा प्रश्न चाहत्यांच्या मनात पडला आहे.
काय आहे व्हिडिओत
वास्तविक हा व्हिडिओ क्रिकेट विश्वचषक स्पर्धेशी संबंधीत आहे. ऋषभ पंतचा 26 वा वाढदिवस आणि वर्ल्ड कपशी संदर्भात बीसीसीआयने एका जाहीराताची व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत ऋषभ पंत हातात काठी आणि डोळ्यांना गॉगल लावून बकऱ्या चारताना दिसत आहे. या व्हिडिओत युवा शुभमन गिल आणि ईशान किशनही आहेत. विश्वचषक स्पर्धेची ही जाहीरात आहे. ऋषभ पंत रस्त्यावर बकऱ्या घेऊन जाताना दिसतो, त्यामुळे संपूर्ण रस्ता अडला गेलाय. याचवेळी टीम इंडियाची बस येते आणि बकऱ्यांमुळे बस रस्त्यात थांबते. बसमधून शुभमन गिल आणि ईशान किशन खाली उतरतात आणि ऋषभ पंतला प्रश्न विचारतात.
गिल आणि ईशान पंतला विचारतात आमची बस का थांबवली, स्टेडिअम तर बरंच दूर आहे. यावर पंत उत्तर देतो विश्वचषक हवा असेल तर थोडं धावा, वॉर्मअप होईल, GOAT बनायचं ना असं तो त्यांना सांगतो. यावर गिल आणि ईशान बस सोडून थेट स्टेडिअमच्या दिशेने पळत सुटतात.
क्रीडा जगतात GOAT चा अर्थ बकरी असा होत नाही. तर GOAT म्हणजे महान खेळाडू. गोट बनण्यासाठी कठोर मेहनत घ्यावी लागेल असं ऋषभ पंत गिल आणि ईशानला या जाहीरातून सुचवताना दिसत आहे.