ICC World Cup 2023 Matches in Mumbai Pune: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने मुंबईमध्ये आयोजित कार्यक्रमामध्ये यंदाच्या वर्षी ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये खेळवल्या जाणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेचं (ICC World Cup 2023) वेळापत्रक जाहीर केलं आहे. भारतामधील एकूण 10 शहांमध्ये 46 दिवसांमध्ये 48 सामने खेळवले जाणार आहेत. स्पर्धेतील दोन्ही महत्त्वाचे सामने म्हणजेच भारत विरुद्ध पाकिस्तानदरम्यानचा सामना 15 ऑगस्ट रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. तसेच स्पर्धेचा अंतिम सामनाही अहमदाबादच्या मैदानात खेळवला जाणार आहे. भारतामधील एकूण 10 शहरांमध्ये हे सामने खेळवले जाणार असले तरी या 46 सामन्यांपैकी केवळ 9 सामने महाराष्ट्रात खेळवले जाणार आहे.


पुण्यातही सामने


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय क्रिकेटची पंढरी असलेल्या मुंबई मध्ये 4 सामने खेळवले जाणार आहेत. तर आश्चर्यकारकरित्या पुण्याचीही निवड या स्पर्धेतील सामने भरवण्याची करण्यात आली आहे. पुण्याचं नाव संभाव्य शहरांच्या यादीमध्येही नव्हतं. मात्र पुण्यामध्ये मुंबईपेक्षाही एक सामना अधिक खेळवला जाणार आहे. त्यामुळे मुंबईकरांबरोबरच पुणेकरांनाही या आंतरराष्ट्रीय स्पर्धेचा प्रत्यक्षात मैदानात जाऊन आनंद घेता येणार आहे. 


नेमक्या कोणकोणत्या मैदानांमध्ये खेळवले जाणार हे सामने?


> अहमदाबाद - नरेंद्र मोदी स्टेडियम
> हैदराबाद - राजीव गांधी अंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, उप्पल
> धरमशाला - हिमाचल प्रदेश क्रिकेट एसोसिएशन स्टेडियम
> दिल्ली - अरुण जेटली क्रिकेट स्टेडियम
> चेन्नई - एमए चिदम्बरम स्टेडियम
> लखनऊ - इकाना क्रिकेट स्टेडियम
> पुणे - एमसीए क्रिकेट स्टेडियम (गहुंजे)
> बेंगळुरु - एम चिन्नास्वामी स्टेडियम
> कोलकाता - ईडन गार्डन
> मुंबई - वानखेडे स्टेडियम


मुंबई-पुण्यात कोणते सामने होणार?


19 ऑक्टोबर-
भारत आणि बांगलादेशदरम्यानचा सामना बुधवारी 19 ऑक्टोबर रोजी खेळवला जाणार आहे. हा सामना पुण्यातील गहुंजे येथील एमसीए क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.


21 ऑक्टोबर- 
शनिवारी, 21 ऑक्टोबर रोजी इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यानचा सामना मुंबईमधील वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.


24 ऑक्टोबर-  
24 ऑक्टोबर म्हणजेच मंगळवारी दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेशदरम्यानचा सामनाही वानखेडेमध्येच खेळवण्यात येणार आहे. 


30 ऑक्टोबर-  
सोमवार 30 ऑक्टोबर रोजी अफगाणिस्तानचा संघ पात्रता फेरीमध्ये दुसऱ्या स्थानावर पात्र ठरणाऱ्या संघाविरुद्ध पुण्यातील गहुंजेमध्ये सामना खेळेल.


1 नोव्हेंबर-  
बुधवारी, 1 नोव्हेंबर रोजी पुण्यातील मैदानामध्येच न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान सामना खेळवला जाईल.


2 नोव्हेंबर- 
दुसऱ्याच दिवशी म्हणजे गुरुवारी 2 नोव्हेंबर रोजी भारताचा सामना असून तो पात्रता फेरीमध्ये दुसऱ्या स्थानी पात्र ठरणाऱ्या संघाविरुद्ध होणार आहे. हा सामना मुंबईत खेळवला जाणार आहे.


7 नोव्हेंबर- 
मंगळवारी, 7 नोव्हेंबर रोजी ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानदरम्यान मुंबईच्या मैदानात सामना खेळवला जाणार आहे.


8 नोव्हेंबर-  
बुधवारी, 8 नोव्हेंबर रोजी इंग्लंड आणि पात्रता फेरीमध्ये पहिल्या स्थानी पात्र ठरणारा संघ एकेमेकांविरोधात पुण्यातील मैदानात उतरतील.


12 नोव्हेंबर- 
साखळी फेरीतील अंतिम सामनाही पुण्यातच खेळवला जाणार आहे. हा सामना रविवारी 12 नोव्हेंबर रोजी ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेशदरम्यान खेळवला जाणार आहे.