ICC World Cup IND vs NZ : आयसीसी विश्वचषकात सलग चार विजय मिळणारी टीम इंडिया (Team India) आता पाचव्या विजयासाठी सज्ज झाली आहे. रविवारी म्हणजे 22 ऑक्टोबरला टीम इंडियाचा मुकाबला बलाढ्य न्यूझीलंडशी (India vs New Zealand) होणार आहे. न्यूझीलंडने संघही चार सामने जिंकून पॉईंटेबलमध्ये (WC PointTable) अव्वल स्थानावर आहे. भारत-न्यूझीलंड सामना धरमशाला स्टेडिअमध्ये खेळवण्यात येणार असून भारतीय वेळेनुसार दुपारी दोन वाजता सामन्याला सुरुवात होईल. भारतीय संघ जबरदस्त फॉर्मात आहे. ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेश या संघांचा टीम इंडियाने एकतर्फी पराभव केलाय. आता सेमीफायनलच्या दृष्टीने न्यूझीलंडविरुद्धचा सामना टीम इंडियासाठी महत्त्वाचा असेल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीम इंडियाला धक्का
न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यासाठी सज्ज होत असतानाच टीम इंडियाला एक मोठा धक्का बसला आहे. अष्टपैलू हार्दिक पांड्यानंतर आता मॅचविन खेळाडू रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) दुखापतग्रस्त झाला आहे. सरावादरम्यान हाताला चेंडू लागल्याने जडेजाला दुखापत झाली. बीसीसीआयने दिलेल्या माहिती नुसार जडेजाची दुखापत फारशी गंभीर नाहीए. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात जडेजा खेळेल असं बीसीसाआयने सांगितलं आहे. सर्जरी करण्याची वेळ आली असती तर काही सामन्यांना मुकावं लागलं असतं. सुदैवाने जडेजाती दुखापत इतकी गंभीर नाहीए. 


रवींद्र जडेजाला विश्रांती?
रवींद्र जडेजा सातत्याने क्रिकेट खेळत असल्याने जडेजाला विश्रांती द्यावी असं मत काही दिग्गज क्रिकेटपटूंनी व्यक्त केलं आहे. पण न्यूझीलंडविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यात जडेजाला विश्वांती देण्याची शक्यता कमीच आहे. त्यातच हार्दिक पांड्याही न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात खेळणार नाहीए. त्यामुळे जडेजाचं संघात असणं टीम इंडियासाठी गरजेचं आहे. अशात नेदरलँडविरुद्धच्या सामन्यात रवींद्र जडेजा विश्रांती दिली जाण्याची शक्यता आहे. 


न्यूझीलंडविरुद्ध कशी असेल प्लेईंग इलेव्हन
न्यूझीलंडविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यात दुखापतग्रस्त हार्दिक पांड्याच्या जागी मोहम्मद शमी किंवा सूर्यकुमार यादवला संधी मिळण्याची शक्यता आहे. या दोघांना गेल्या चार सामन्यात एकदाही संधी मिळालेली नाही. काँग्रेस नेता शशी थरुर यांनी हार्दिक पांड्याच्या जागी सूर्यकुमार यादव आणि शार्दुल ठाकूरच्या जागी मोहम्मद शमीला खेळवण्यात यावं असं म्हटलंय. 


 याशिवाय रोहित शर्मासमोर आर अश्विनचा पर्यायही उपलब्ध आहे. आर अश्विनला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यात संधी देण्यात आली होती. या सामन्यता अश्विनने दहा षटकात 34 धावा देत एक विकेट घेतली होती. अश्विन गोलंदाजीबरोबरच आठव्या क्रमांकावर उपयुक्त फलंदाजीही करु शकतो. शार्दुल ठाकूरला वगळून अश्विनला संधी देण्यात यावी अशी मागणीही केली जाऊ लागली आहे. गेल्या तीन सामन्यात शार्दुलला सात्तत्याने संधी दिली जात आहे. पण त्याला समाधानकारक कामगिरी करता आलेली नाही.