World Cup 2023 : एक पराभव आणि... पुढच्या 6 दिवसात `हे` 5 संघ होणार वर्ल्ड कपमधून बाहेर?
ICC World Cup 2023 : आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा आता सेमीफायनलच्या दिशेने सरकतेय. येत्या सहा दिवसात म्हणजे 31 ऑक्टोबरपर्यंत सेमीफायनलचं चित्र जवळपसा स्पष्ट होईल. 31 ऑक्टोबरला स्पर्धेतला 31 वा सामना खेळवला जाईल.
World Cup 2023 Semi Final Scenario: भारतात सुरु असलेल्या आयसीसी विश्वचषक स्पर्धा आता चुरशीची होत चालली आहे. विश्वचशकातला प्रत्येक सामना सेमीफानयलच्या (WC Semifinal) दृष्टीने महत्त्वाचा असणार आहे. स्पर्धेत आतापर्यंत 24 सामने जिंकले असून येणाऱ्या सहा दिवसात म्हणजे 31 ऑक्टोबरपर्यंत सेमीफायनलचं चित्र जवळपास स्पष्ट होणार आहे. 31 ऑक्टोबरला विश्वचषकातला 31 वा सामना खेळवला जाणार आहे. त्याआधी 29 ऑक्टोबरला भारत आणि इंग्लंडदरम्यान (India vs England) महत्त्वाचा सामान रंगणार आहे. या सामन्यात विजय मिळवल्यास टीम इंडियाचं (Team India) सेमीफायनलमधलं स्थान निश्चित होणार आहे.
6 दिवसात हे संघ होणार बाहेर?
पुढच्या सहा दिवसात पाच संघ बाहेर स्पर्धेतून जवळपास बाहेर पडतील. म्हणजे या संघांच्या सेमीफायनलमध्ये पोहोचण्याच्या आशा संपुष्टात येतील. यात सर्वात मोठा धक्का बसू शकतो तो म्हणजे पाकिस्तान संघाला. 27 ऑक्टोबरला पाकिस्तानला बलाढ्य दक्षिण आफ्रिकेचा सामना करायचाय. दक्षिण आफ्रिका जबरदस्त फॉर्मात आहे. त्यामुळे पाकिस्तान हा सामना जिंकण्याची शक्यता फारच कमी आहे. अशाच हा सामना हरला तर बाबर आझमच्या पाकिस्तान संघाची घरवापसी नक्की आहे. दक्षिण आफ्रिकेनंतर पाकिस्तानाच पुढचा सामना बांगलादेशशी होईल. बांगलादेश संघातही उलटफेर करण्याची ताकद आहे.
याशिवाय श्रीलंका, अफगाणिस्तान, नेदरलँड आणि बांगलादेश हे संघही सेमीफायनलच्या शर्यतीतून बाहेर पडणं जवळपास निश्चित होईल. नेदरलँड आणि बांगलादेश संघाला पाचपैकी केवळ एका सामन्यात विजय मिळवता आला आहे. तर अफगाणिस्तानने पाच पैकी दोन सामन्यात विजय मिळवलाय. अफगाणिस्तानचा पुढचे तीन सामने श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेशी असणार आहे. श्रीलंकेलाही चारपैकी केवळ एका सामन्यात विजय मिळवता आला आहे. तर इंग्लंडलाही चारपैकी एका सामन्यात विजय मिळवता आला आहे.
28 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडदरम्यान सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यामुळे पॉईंटटेबलचं चित्र आणखी स्पष्ट होणार आहे.
या चार संघांची सेमीफायनलमध्ये एन्ट्री?
सध्या पॉईंटटेबलमध्ये टीम इंडिया 10 अंकांसह अव्वल स्थानावर आहे. त्यानंतर दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड प्रत्येकी आठ पॉईंटसह दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत. तर ऑस्ट्रेलियाने खराब सुरुवातीनंतर मोठी झेप घेतली आहे. ऑस्ट्रेलिया चौथ्या स्थानावर आहे.
विश्वचषक स्पर्धेचं 31 ऑक्टोबरपर्यंतचं वेळापत्रक
पाकिस्तान विरुद्ध दक्षिण अफ्रीका - चेन्नई - 27 ऑक्टोबर
ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूजीलैंड - धर्मशाला - 28 ऑक्टोबर
बांग्लादेश विरुद्ध नीदरलैंड्स - कोलकाता - 28 ऑक्टोबर
भारत बनाम विरुद्ध - लखनऊ - 29 ऑक्टोबर
श्रीलंका विरुद्ध अफगानिस्तान - पुणे - 30 ऑक्टोबर
पाकिस्तान विरुद्ध बांग्लादेश - कोलकाता - 31 ऑक्टोबर