टी-२० वर्ल्ड कप: हरमनप्रीत कौरचं धडाकेबाज शतक
टी-२० वर्ल्ड कपला भारतीय महिला टीमनं दिमाखात सुरुवात केली आहे.
गयाना : टी-२० वर्ल्ड कपला भारतीय महिला टीमनं दिमाखात सुरुवात केली आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या मॅचमध्ये भारतीय टीमची कर्णधार हरमनप्रीत कौरनं धडाकेबाज शतक लगावलं आहे. हरमनप्रीतच्या शतकाच्या जोरावर भारतानं २० ओव्हरमध्ये १९४/५ एवढा स्कोअर केला. हरमनप्रीतनं ५१ बॉलमध्ये १०३ रनची खेळी केली. यामध्ये ७ फोर आणि ८ सिक्सचा समावेश होता. हरमनप्रीतला जेमीमाह रॉड्रिक्सनंही चांगली साथ दिली. जेमीमाहनं ४५ बॉलमध्ये ५९ रन केले.
भारतानं केलेल्या १९४ रन हा महिलांच्या आंतरराष्ट्रीय टी-२० वर्ल्ड कपमधला सर्वाधिक स्कोअर आहे. महिलांच्या आंतरराष्ट्रीय टी-२० मॅचमध्ये शतक करणारी हरमनप्रीत कौर ही पहिली भारतीय आहे. तर आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये शतक करणारी हरमनप्रीत तिसरी कर्णधार आहे. महिलांच्या टी-२० वर्ल्ड कपमध्ये शतक करणारी हरमनप्रीत तिसरी खेळाडू आहे.