सेंट लुसिया : टी-२० वर्ल्ड कपमध्ये भारतीय महिला टीमचा सामना इंग्लंडशी होणार आहे. वेस्ट इंडिजनं त्यांच्या शेवटच्या ग्रुप मॅचमध्ये इंग्लंडचा ४ विकेटनं पराभव केल्यानंतर वर्ल्ड कपच्या चारही सेमी फायनलच्या टीम निश्चित झाल्या आहेत. २२ नोव्हेंबरलाच दोन्ही सेमी फायनल होणार आहेत. यातली पहिली सेमी फायनल ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिजमध्ये तर दुसरी सेमी फायनल भारत-इंग्लंडमध्ये होईल. या दोन्ही मॅचमध्ये जिंकलेल्या टीम २४ नोव्हेंबरला फायनलमध्ये भिडतील.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावर्षीच्या टी-२० वर्ल्ड कपमध्ये भारतीय टीम शानदार फॉर्ममध्ये आहे. ग्रुप स्टेजमध्ये भारताचा सगळ्या ३ मॅचमध्ये विजय झाला आहे. आता सेमी फायनलमध्ये ५० ओव्हरच्या वर्ल्ड कप फायनलमध्ये इंग्लंडनं केलेल्या पराभवाचा बदला घेण्यासाठी भारतीय टीम मैदानात उतरेल.


सेमी फायनलमध्ये पोहचण्यासाठी हरमनप्रीत कौरच्या टीमनं ३ वेळा चॅम्पियन असलेल्या ऑस्ट्रेलियाला पराभूत केलं होतं. ग्रुप स्टेजच्या शेवटच्या मॅचमध्ये भारताचा ऑस्ट्रेलियावर ४८ रननं विजय झाला. ग्रुप एमध्ये मागच्यावेळचा टी-२० वर्ल्ड कप जिंकणारी वेस्ट इंडिज ८ पॉईंट्ससह पहिल्या क्रमांकावर राहिली.