क्रिकेट समीक्षक ब्लॉग रवि पत्की, झी मीडिया मुंबई: जागतिक कसोटी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोहचणे भारताला सहज सोपे नव्हते.खूप कष्ट घेऊन,जीवन मरणाचा प्रश्न करत सर्व खेळाडूंनी बाजी लावली. खूप चढ उतार आले. स्पर्धेच्या मध्येच कोव्हिड मुळे Percentage सिस्टीम आली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात जाऊन हरवायला लागणार होते तर इंग्लंड सारख्या कसोटी क्रिकेटला सर्वस्व मानणाऱ्या संघाला भारतात चांगल्या फरकाने हरवायचे होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दोन वर्षे चाललेल्या ह्या स्पर्धेत भारताने 6 मालिका खेळल्या.त्या पैकी 5 जिंकल्या आणि 1 हरली. भारतीय संघ 17 कसोटी खेळला.त्यात 12 जित 4 हार आणि 1 अनिर्णित अशी स्थिती राहिली. भारताची सुरुवात वेस्ट इंडिज मध्ये झाली.वेस्ट इंडिजला त्यांच्याच भूमीवर भारताने 2-0 हरवले. 
वेस्ट इंडिज कितीही संक्रमण काळातून जात असली तरी त्या संघाला त्यांच्या भूमीवर हरवणे सोपे नसते.ह्या मालिकेत हनुमा विहारीने पहिले शतक साजरे केले. त्यानंतर भारताने आफ्रिकेला भारतात 3-0 लोळवले. ह्या मालिकेत रोहितला पहिल्यांदाच कसोटीत सलामीला खेळवण्यात आले.


भारताने बांगलादेशला भारतात 2-0लोळवले.त्यात पहिल्यांदाच गुलाबी चेंडूवर भारतात कसोटी खेळली गेली. पुढचा दौरा भारतासाठी खडतर ठरला.न्यूझीलंड मधील वातावरणाशी जुळवून घेण्यात संघ कमी पडला आणि 2-0 मालिका हरला.


ऑस्ट्रेलियात भारताने 2-1 असा अविश्वसनिय विजय मिळवला.त्यात सिडनीत ठेवलेला अनिर्णित सामना आणि मेलबर्न आणि ब्रिस्बेन मध्ये मिळवलेल्या विजयाने क्रिकेट रसिकांची छाती गर्वाने फुलून आली.रिषभ पंत, शार्दूल,सुंदर,रहाणे, सिराज,राहणे,गिल यांच्या सांघिक खेळाने भारताने अशक्य होते ते शक्य करून दाखवले.


अखेरच्या मालिकेत इंग्लंडला भारताने भारतात 3-1 अशी धूळ चारली. सर्व 17 सामने खेळलेल्या फ्लनदाजांपैकी रहाणेने 43.80 च्या सरासरीने 1095 धावा करून पहिला नंबर मिळवला तर पुजाराने 17 कसोटीत 818 धावा केल्या.कोहलीने 14 कसोटीत 877 धावा केल्या. 


गोलनदाजीत अश्विनने 13 सामन्यात 67 विकेट्स काढून कमाल केली तर शमी आणि इशांत ने 36 विकेट्स घेऊन दुसरा क्रमांक मिळवला. अखेर भारताने 520 गुण आणि 72.2 च्या टक्केवारीने दिमाखात अंतिम सामन्यात प्रवेश केला.