WTC Points Table India: इंग्लंड आणि पाकिस्तान (PAK vs ENG) यांच्यात खेळल्या गेलेल्या दुसऱ्या सामन्यात इंग्लंडने यजमान पाकिस्तानचा पराभव केला. बेन स्टोक्सच्या (Ben Stokes) नेतृत्वाखाली इंग्लंड संघाने 22 वर्षांनंतर पाकिस्तानच्या भूमीवर कसोटी मालिका जिंकून (England secure series win) जबरदस्त कामगिरी केली. मात्र या पराभवामुळे पाकिस्तानने सिरीज तर गमावली पण सोबतच WTC ची फायनल खेळण्याचं स्वप्न देखील भंगलं आहे. शिवाय WTC Points Table मध्ये मोठा उलटफेर झाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंग्लंडने केलेल्या पराभवामुळे पाकिस्तानचं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (ICC World Test Championship) खेळण्याचं स्वप्न मोडलं आहे. आपल्याच घरात पाकिस्तानला मिळालेल्या 0-2 अशा पराभवामुळे ही टीम WTC फायनलच्या रेसमधून बाहेर पडली आहे. दुसऱ्या टेस्टमध्ये झालेल्या पराभवामुळे 42.42% विन पर्सेंटेंजवर 6 व्या क्रमांकावर जाऊन पोहोचली आहे.


52.08% विन पर्सेंटेंजमुळे टीम इंडिया (Team India) चौथ्या क्रमांकावर


दुसरीकडे पाकिस्तानसोबतच इंग्लंड देखील या स्पर्धेच्या फायनल रेसमधून बाहेर गेली आहे. इंग्लंडची टीम 44.44% विन पर्सेंटेजसोबत पाचव्या क्रमांकावर आहे. तर आता चाहत्यांच्या मनात प्रश्न आहे की, टीम इंडियाच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये कशी पोहोचू शकते. तर टीमला अजूनही फायनल गाठण्याची संधी आहे, मात्र हा मार्ग आता अधिकच खडतर झाला आहे.


टीम इंडिया फायनलमध्ये कशी पोहोचणार? 


भारताला बांगलादेशविरूद्धचे 2 टेस्ट सामने आणि ऑस्ट्रेलियाच्या धर्तीवर खेळण्यात येणाऱ्या 4 टेस्ट सामन्यांची सिरीज खेळायची आहे. टीम इंडिया जर 6 टेस्ट सामन्यांमध्ये 2 सामने हरली तर WTC मधून पत्ता कट होऊ शकतो. दुसरीकडे WTC फायनलमध्ये पोहोचण्यासाठी टीम इंडियाला बांगलादेशाला 2-0 ने हरवावं लागणाप आहे. यानंतर ऑस्ट्रेलियाविरूद्ध 3-1 किंवा 3-0 ने सिरीज जिंकली तरीही WTC च्या फायनलचं तिकीच कन्फर्म आहे.


इंग्लंडकडून पाकिस्तानचा पराभव


दुसऱ्या कसोटी सामन्यात (Pakistan vs England, 2nd Test) इंग्लंडने पहिल्या डावात 281 धावा केल्या, त्याला प्रत्युत्तर देताना पाकिस्तानचा पहिला डाव 202 धावांवर आटोपला. यानंतर इंग्लंडने दुसऱ्या डावात 275 धावा केल्या आणि पाकिस्तानसमोर विजयासाठी 355 धावांचे लक्ष्य ठेवलं. मात्र, अखेर पाकिस्ताला अखेर 328 धावांवर समाधान मानावं लागलं. मार्क वूडने (Mark Wood) घातक गोलंदाजी करत दुसऱ्या डावात 4 गडी तंबूत पाठवले.


तीन सामन्याची मालिकेतील (Pakistan vs England, 3rd Test) अखेरचा सामना येत्या 17 डिसेंबरला खेळला जाणार आहे. कराचीमध्ये (karachi) हा सामना रंगणार असल्याने पाकिस्तानला चांगली कामगिरी करण्याची गरज आहे. तिसरा सामना जिंकून मालिकेच लाज राखण्याचं लक्ष्य बाबर सेनेचं असणार आहे.