मुंबई: भारत विरुद्ध न्यूझीलंड सामना 18 ते 22 जून दरम्यान इंग्लंडमध्ये होणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या या अंतिम सामन्यापूर्वी खेळाडूनं विवाह केला आहे. या विवाहाची सर्वत्र चर्चा होत आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्याआधी न्यूझीलंड संघातील हेनरी निकोल्‍सने आपल्या गर्लफ्रेंडसोबत विवाह केला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

न्यूझीलंडचा खेळाडू हेनरी निकोल्स याने आपल्या विवाहाची माहिती इंन्स्टाग्रामवर दिली आहे. आपल्या लग्नाचा फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे. मिस्टर आणि मिसेस निकोलस असं त्याने कॅप्शन देत फोटो शेअर केला. त्याला न्यूझीलंडच्या संघासह चाहत्यांनी खूप शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. 



न्यूझीलंडचा संघ इंग्लंडविरुद्ध 2 ते 6 जून रोजी लॉर्ड्स मैदानावर आणि 10 ते 15 जून रोजी बर्मिंघम येथे खेळणार आहे. त्यानंतर भारत विरुद्ध न्यूझीलंड आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना 18 जूनपासून साऊथॅम्प्टन येथे खेळला जाणार आहे.