मुंबई : भारताचा क्रिकेटर शमीची पत्नी हसीन जहांने रविवारी पुन्हा प्रेस कॉन्फरन्स घेतली. यावेळी तिने पुन्हा शमीवर आरोप केलेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी हसीन म्हणाली, मी शमीला समजून घेण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला. मात्र त्याने स्वत:ची चूक कबूल केली नाही. मी बऱ्याच काळापासून हा प्रॉब्लेम सोडवण्याचा प्रयत्न करतेय. जर शमीचा फोन माझ्या हाती नसता लागला तर तर आतापर्यंत त्याने मला घटस्फोटाची नोटीस पाठवली असती. मी नेहमीच नाते वाचवण्याचा प्रयत्न केला आणि करतेय. 


हसीन जहां पुढे म्हणाली, मला नाही माहीत हा वाद कधी शमेल. आमच्या दोघांमधील वाद टोकाला गेलाय. माझ्या मते या वादाने मर्यादा ओलांडल्यात. आता जर मी माघार घेतली तर मी केलेले आरोप चुकीचे होते असा समज होईल. 


शमी माझ्यावर कोणतेही आरोप करतोय. मी शमीला माझ्यापरीने समजावण्याचा प्रयत्न केला. माझ्या हाती जेव्हा पुरावे आले तेव्हा शमीशी बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र तेव्हा त्याने फोन उचलणेच बंद केले. मी सतत त्याला फोन करत होते आणि तो मला टाळत होता. तेव्हाही तो आरोपांना नकार देत होता. 


गेल्या अनेक दिवसांपासून शमी आणि पत्नी हसीन जहां एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करतायत.