GT vs LSG, IPL 2023: गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपर जायन्ट्स (Gujarat Titans vs Lucknow Super Giants) यांच्यात आयपीएलचा 51 वा सामना खेळवला जात आहे. नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium) खेळला जात असलेल्या सामन्यात लखनऊची जबाबदारी कृणाल पांड्याकडे (Krunal Pandya) सोपवण्यात आली आहे. केएल राहूल (KL Rahul) जखमी असल्याने आता कृणालच्या खांद्यावर जबाबदारी असेल. कॅप्टन म्हणून खेळत असलेल्या पहिल्या सामन्यात पावसाने अटकाठी केल्याने सामना ड्रॉ राहिला होता. त्यानंतर आता कृणाल आपल्याच भावाविरुद्ध भिडण्यासाठी मैदानात उतरला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सामन्यापूर्वी टॉसच्यावेळी कर्णधार म्हणून भावा-भावांची उपस्थिती हा दोन्ही बंधुंसाठी खास आणि भावनिक क्षण होता. टॉसवेळी बोलताना हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) वडिलांची आठवण काढली.


काय म्हणाला हार्दिक पांड्या?


टॉस जिंकून लखनऊने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. आम्ही टॉस जिंकला असता तर फलंदाजी निवडली असती, असं हार्दिक पांड्या (Hardik Pandya) म्हणाला. त्यावेळी त्याला भावाच्या कॅप्टन्सीवरून प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी, हा भावनिक दिवस आहे, आज आमचे वडील असते तर त्यांना अभिमान वाटला असता, असं म्हणत हार्दिक भावूक झाल्याचं दिसून आलं. आयपीएलच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडत आहे, त्यामुळे आमच्या कुटुंबाला याचा अभिमान आहे, असंही हार्दिक म्हणतो.


पाहा Video



आजच्या सामन्यात निकालाची चिंता न करता स्वतःला करायचं आहे. आज अपयशाची भीती मनात रेंगाळू शकते. मात्र, आज पांड्या नक्कीच जिंकेल. आम्हाला फक्त चांगलं क्रिकेट खेळायचं आहे, असं म्हणत हार्दिकने भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. संघात एक बदल करण्यात आला आहे. जोशुआ लिटलच्या जागी अल्झारी जोसेफला संघात आणण्यात आल्याची माहिती देखील पांड्याने यावेळी दिली होती.


आणखी वाचा - माझं आयुष्य सार्थ झालं... लेकाला IPL खेळताना पाहून बापाच्या डोळ्यात पाणी; पाहा Video


दरम्यान, नुकत्याच हाती आलेल्या वृत्तानुसार, गुजरातच्या फलंदाजांनी लखनऊच्या गोलंदाजांना भर उन्हात चांदण्या दाखवल्या. 20 ओव्हरमध्ये जबरदस्त आतिषबाजी करत 227 धावांचा डोंगर गुजरातने उभा केलाय. यात खास राहिला तो शुभमन गिल (Shubman Gill), त्याने 51 बॉलमध्ये 94 धावांची नाबाद खेळी केलीये. त्यात 7 सिक्सचा समावेश आहे.


 


पाहा Playing XI:


गुजरात टायटन्स: ऋद्धिमान साहा (विकेटकीपर), शुभमन गिल, हार्दिक पांड्या (कर्णधार), विजय शंकर, डेविड मिलर, अभिनव मनोहर, राहुल तेवतिया, राशिद खान, मोहित शर्मा, नूर अहमद, मोहम्मद शमी 


लखनऊ सुपर जायंट्स: क्विंटन डिकॉक (विकेटकीपर), कायेल मेयर्स, दीपक हुड्डा, करण शर्मा, क्रुणाल पांड्या (कर्णधार), मार्कस स्टोइनिस, स्वप्निल सिंह, यश ठाकुर, रवि बिश्नोई, मोहसिन खान, आवेश खान