Sunil Gavaskar: रहाणे असता तर...; द.आफ्रिकेविरूद्ध फलंदाज फेल गेल्यावर गावस्करांना आठवला अजिंक्य
Sunil Gavaskar: सुनील गावस्कर यांना अजिंक्य रहाणेची उणीव जाणवली असल्याचं दिसून आलं. गावस्कर यांच्या म्हणण्यानुसार, रहाणे टीममध्ये असता तर भारताची स्थिती चांगली असती.
Sunil Gavaskar: टीम इंडिया सध्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे. टी-20 आणि वनडे सिरीजनंतर आता टेस्ट सिरीजमधील पहिला सामना सुरु आहे. या सामन्यात टीम इंडियाच्या फलंदाजांना साजेसा खेळ करता आला नाही. के.एल राहुल सोडून एकाही फलंदाजाने उत्तम कामगिरी केली नाही. या सामन्यात टीम इंडियाच्या टॉपचे फलंदाजही फेल ठरलेत. अशातच आता टीम इंडियाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांना मराठमोळा खेळाडू अजिंक्य रहाणेची आठवण झाली आहे.
रहाणे टीममध्ये असता तर...
सुनील गावस्कर यांना अजिंक्य रहाणेची उणीव जाणवली असल्याचं दिसून आलं. गावस्कर यांच्या म्हणण्यानुसार, रहाणे टीममध्ये असता तर भारताची स्थिती चांगली असती.
2017-18 मध्ये भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यात जोहान्सबर्गमधील कठीण खेळपट्टीवर अजिंक्य रहाणेने 48 रन्स केले होते. याचा संदर्भ देत गावस्कर म्हणाले, “पाच वर्षांपूर्वी जोहान्सबर्ग टेस्टची खेळपट्टी सोपी नव्हती. त्यावेळी मी तिथे उपस्थित होतो. अजिंक्य रहाणेने संधीचा फायदा घेत शानदार फलंदाजी केली होती. त्याने दाखवून दिलं की, त्याच्या आधी आलेल्या भारतीय फलंदाजांनी काय चुका केल्या आहेत.
दक्षिण आफ्रिकेतील शेवटचा टेस्ट सामना भारताने मोठ्या फरकाने गमावले नाहीयेत. रहाणेसारखा खेळाडू या दौऱ्यातही फायदेशीर ठरू शकतो. तो भारताबाहेर सातत्यपूर्ण रन्स करणारा खेळाडू आहे. पहिल्या दिवशी तो तिथे असता तर भारताच्या टीमचं चित्र काही वेगळच असतं, असंही गावस्कर यांनी सांगितलं आहे.
कशी आहे अजिंक्य रहाणेची कामगिरी?
कठीण पीचवर अजिंक्य रहाणेची नेहमी चांगली कामगिरी दिसून आली आहे. रहाणेने दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्याविरूद्ध सातत्यपूर्ण कामगिरी केलीये. अजिंक्य रहाणे 2013-14 मध्ये पहिल्यांदा दक्षिण आफ्रिकेला गेला होता. त्यावेळी रहाणेने या दौऱ्यावर 4 टेस्टमध्ये 47, 15, 51* आणि 96 रन्स केले होते. अजिंक्य रहाणेने 2013-14 मध्ये डर्बन किंग्समीडमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 157 बॉल्समध्ये 96 रन्सची खेळी खेळली.