Yashasvi Jaiswal : तब्बल एका महिन्याच्या ब्रेकनंतर टीम इंडियाला ( Team India ) आता वेस्ट इंडिजविरूद्ध सिरीज खेळायची आहे. 12 जुलैपासून वेस्ट इंडिजविरूद्धच्या दौऱ्याला सुरुवात होणार आहे. यावेळी टीम इंडियाला प्रथम टेस्ट सामना खेळायचा आहे. वेस्ट इंडिजविरूद्धच्या टेस्टसाठी टीम इंडियामध्ये यशस्वी जयस्वालची ( Yashasvi Jaiswal ) निवड करण्यात आली आहे. दरम्यान यावेळी या तरूण खेळाडूने मैदानावर होणाऱ्या स्लेजिंगविरूद्ध आवाज उठवला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यंदाच्या आयपीएलमध्ये यशस्वी जयस्वालची ( Yashasvi Jaiswal ) बॅट चांगलीच तळपली. त्याच्या या उत्तम खेळीनंतर वेस्ट इंडिजविरूद्धच्या ( West Indies )  टेस्ट सामन्यात जयस्वालला टीममध्ये ( Team India ) संधी देण्यात आलीये. गेल्या वर्षी दुलीप ट्रॉफीमध्ये देखील जयस्वालला ( Yashasvi Jaiswal ) संधी मिळाली होती. दरम्यान यावेळी त्याचं रूद्र अवतार प्रेक्षकांच्या समोर आला होता. 


दुलीप ट्रॉफीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यामध्ये कर्णधार अजिंक्य रहाणेने ( Ajinkya Rahane ) जयस्वालला मैदानाबाहेर जाण्यास सांगितलं होतं. अशातच आता लल्लनटॉपशी बोलताना यशस्वी जयस्वालने स्लेजिंगविरूद्ध त्याचं मत व्यक्त केलं आहे. 


स्लेजिंगविषयी काय म्हणाला यशस्वी जयस्वाल?


यशस्वी ( Yashasvi Jaiswal ) म्हणाला की, मुळात आक्रामता ही महत्त्वपूर्ण असते. मुख्य म्हणजे मी मानसिकरित्या आक्रामक आहे. अनेकदा ती बाहेर येते. मात्र मला अजूनही असं वाटतं की, त्यावेळी मी काही मोठं केलं नव्हतं. स्लेजिंग ही प्रत्येकासोबत होते. मात्र याबाबतीत अनेकांना त्याची माहिती मिळत नाही. 


जयस्वाल पुढे म्हणाला की, कोण काय करतं त्यावर स्लेजिंगच्या गोष्टी अवलंबून असतात. मला कोणीही माझ्या आई किंवा बहिणीवरून बोलेल आणि मी ऐकून घेऊ का?


जयस्वाल करणार टेस्टमध्ये डेब्यू?


टीम इंडिया आता वेस्ट इंडिजविरूद्ध खेळणार आहे. 12 जुलैपासून डोमिनिकाच्या विंडसर पार्कमध्ये 12 ते 16 जुलै दरम्यान पहिली टेस्ट खेळवली जाणार आहे. याशिवाय दुसरी टेस्ट 20 ते 24 जुलै दरम्यान त्रिनिदादच्या क्वीन्स पार्क ओव्हलवर खेळवण्यात येईल. दरम्यान यशस्वी जयस्वालसाठी ( Yashasvi Jaiswal ) ही टेस्ट खास असणार आहे. कारण यामध्ये त्याचा समावेश केला जाण्याची शक्यता आहे.