दुबई : T20 वर्ल्डकप 2021च्या अत्यंत महत्त्वाच्या सामन्यात न्यूझीलंडला अफगाणिस्तानचा सामना करावा लागणार आहे. अबुधाबीमध्ये होणाऱ्या या सामन्यावर करोडो भारतीय चाहत्यांच्या आशा पल्लवित आहेत. केन विल्यमसन न्यूझीलंड संघाचे नेतृत्व करेल, तर मोहम्मद नबी अफगाण संघाचे नेतृत्व करणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाने ग्रुप 1 मधून उपांत्य फेरीतील आपलं स्थान पक्कं केलं आहे. आता क्रिकेटप्रेमींचे लक्ष ग्रुप 2 कडे लागलं आहे. यामध्ये पाकिस्तानचा संघ सलग चार सामने जिंकून उपांत्य फेरीसाठी पात्र ठरला आहे. अशा स्थितीत दुसऱ्या ग्रुपतून सेमीफायनलसाठी दुसरी टीम अजून निश्चित व्हायची आहे. 


भारतीय संघाचं भवितव्यंही न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामन्यावर अवलंबून आहे. या निकालातून समोर येणार्‍या परिणामांबद्दल जाणून घेऊया.


न्यूझीलंड जिंकली तर


किवी टीमने अफगाणिस्तानला हरवून उपांत्य फेरीत आपले स्थान पक्कं करू शकतात. कारण या विजयामुळे त्यांचे 8 गुण होतील. ते भारताच्या आवाक्याबाहेर असेल आणि मोहम्मद नबीच्या टीमचे 4 गुण होतील. अशा स्थितीत भारत आणि अफगाणिस्तानचे संघ स्पर्धेबाहेर होतील.


जर न्यूझीलंड संघ जिंकला आणि स्कॉटलंडविरुद्ध पाकिस्तानचा पराभव झाला, तर ब्लॅक कॅप्स चांगल्या नेट रनरेच्या जोरावर ग्रुप-2 मध्ये अव्वल ठरू शकतात.


  • न्यूझीलंड: उपांत्य फेरीसाठी पात्र, पॉईंट्स टेबलमध्ये अग्रस्थानी पोहोचण्याची देखील शक्यता

  • अफगाणिस्तान : बाहेर

  • भारत: बाहेर


अफगाणिस्तान जिंकली तर


अफगाणिस्तान जिंकल्यास भारतीय टीमचे दरवाजे उघडतील. न्यूझीलंडविरुद्धच्या विजयामुळे अफगाणिस्तानचे सहा गुण होतील. ज्यामुळे ते न्यूझीलंडशी बरोबरी साधतील. तसंच न्यूझीलंडचा संघही अफगाणिस्तानच्या तुलनेत नेट रनरेटमुळे स्पर्धेतून बाहेर पडेल.


जर मॅच अनिर्णीत समाप्त झाली तर


अबुधाबीचे हवामान पाहता पाऊस पडणं अशक्य आहे. तसंच, अमर्यादित सुपर ओव्हरच्या नियमामुळे सामना बरोबरीत सुटण्याची शक्यता नाही. मात्र, न्यूझीलंड आणि अफगाणिस्तानला गुणांचं विभाजन करावं लागले तर न्यूझीलंड सात गुणांवर पोहोचेल. जे भारतासाठी अशक्यच होईल.


  • न्यूझीलंड: सेमीफाइनलमध्ये

  • अफगाणिस्तान: बाहेर

  • भारत: बाहेर