Gautam Gambhir on Virat kohli: मंगळवारी झालेल्या सामन्यात ग्लेन मॅक्सवेलने तुफान फलंदाजी करत 200 रन्स ठोकलेत. यंदाच्या वर्ल्डकपमध्ये दुहेरी शतक झळकवणारा तो पहिला फलंदाज ठरला आहे. दरम्यान मॅक्सवेलच्या ( Glenn Maxwell ) या तुफान खेळीनंतर टीम इंडियाचा माजी खेळाडू गौतम गंभीरने ( Gautam Gambhir ) विराट कोहलीचे ( Virat kohli ) कान टोचले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नुकतंच दक्षिण आफ्रिकेविरूद्ध खेळताना विराट कोहलीने ( Virat kohli ) वनडे सामन्यातमधील 49 वं शतक ठोकलं. यावेळी गौतम गंभीरने ( Gautam Gambhir ) विराटच्या धीम्या खेळीवरून त्याच्यावर टीका केलीये. 


गंभीरच्या ( Gautam Gambhir ) म्हणण्यानुसार, शतकाच्या दबावामुळे कोहलीने ( Virat kohli ) शेवटी संथपणे खेळायला सुरुवात केली. जर स्कोरकार्डवर गरजे इतके रन्स नसते तर त्याची अशी खेळी टीम इंडियासाठी धोकादायक ठरू शकली असती.


स्पोर्ट्सकीडा या वेबसाईटशी बोलताना गंभीर ( Gautam Gambhir ) म्हणाला की, शतकाच्या दबावामुळे कोहलीने शेवटच्या 5-6 ओव्हर्समध्ये वेग कमी केला. श्रेयसने ज्या पद्धतीने रिस्क घेऊन फलंदाजी करत कोहलीवरचं प्रेशर कमी केलं, त्याचं कौतुक केलं पाहिजे. दोघांनीही चांगली फलंदाजी केली. 


दक्षिण आफ्रिकेविरूद्ध कोहलीचं खणखणीत शतक


दक्षिण आफ्रकेविरूद्धच्या सामन्यात कोहलीने ( Virat kohli ) कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर पुन्हा एकदा चाहत्यांना खूश केलं. या सामन्यात कोहलीने 101 रन्सची नाबाद खेळी केली. यावेळी विराटने एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वाधिक शतकांच्या बाबतीत सचिन तेंडुलकरच्या 49 शतकांची बरोबरी केलीये. सचिनला मागे टाकण्यापासून विराट आता केवळ 1 पाऊल मागे आहे. 


विराटकडून मॅक्सवेलचं कौतुक


मॅक्सवेलची ( Glenn Maxwell ) नाबाद 201 धावांची खेळी पाहून विराटने ( Virat kohli ) देखील मॅक्सवेलचं कौतुक केलं आहे. अगदी मोजक्या शब्दांमध्ये मॅक्सवेलचं ( Glenn Maxwell ) कौतुक करणारी इन्स्टाग्राम स्टोरी विराटने शेअर केली आहे. 'फक्त तुलाच हे जमू शकतं' असं कॅप्शन देत विराटने इन्स्ट्ग्राम स्टोरीमध्ये मॅक्सवेलचा फोटो शेअर करत त्याचं कौतुक केलं आहे.