Virat Kohli, India vs Bangladesh: पुण्याच्या स्टेडियममध्ये टीम इंडियाने ( Team India ) बांगलादेशाचा 7 विकेट्सने पराभव केला आहे. या विजयासह टीम इंडियाने वनडे वर्ल्डकपमध्ये सलग चौथा विजय मिळवला. या सामन्यात टीम इंडियाचा ( Team India ) खेळाडू विराट कोहलीने तुफान शतक मारत विजय मिळवून दिला. दरम्यान हे शतक पूर्ण करताना किंग कोहलीवर ( Virat Kohli ) चाहत्यांनी टीका केली आहे. शतक पूर्ण करण्यासाठी आणि स्वतःच्या रेकॉर्डसाठी कोहलीने सेल्फीशपणा केला असं चाहत्याचं म्हणणं आहे. 


विराट कोहलीची तुफान खेळी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बांगलदेशविरूद्धच्या सामन्यात विराट कोहलीने ( Virat Kohli ) 97 बॉल्समध्ये 103 रन्सची खेळी केली. यादरम्यान त्याने 4 सिक्स आणि 6 फोर लगावले. यावेळी विराटचा स्ट्राईक रेट 106.18 होता. मात्र यावेळी सामना तेव्हा जास्त रोमांचित झाला ज्यावेळी टीम इंडियाच्या विजयासाठी 66 बॉल्समध्ये 19 रन्सची गरज होती. अशा परिस्थितीत कोहली 81 रन्सवर नाबाद खेळत होता.


सामन्यामध्ये एकवेळ परिस्थिती अशी आली होती, ज्यावेळी टीम इंडियाला जिंकण्यासाठी आणि विराट कोहलीला ( Virat Kohli ) विजयासाठी 19 रन्सची आवश्यकता होती. त्यानंतर केएल राहुल नॉन स्ट्राईकवर उभा राहिला. यानंतर कोहली( Virat Kohli ) पुढचे 15 बॉल्स टीम इंडिया जिंकेपर्यंत स्ट्राइकवर राहिला.


टीम इंडियाला लवकर विजय मिळावा यासाठी अनेक वेळा कोहलीने ( Virat Kohli ) सिंगल रन घेण्याचा प्रयत्न केला. पण यावेळी राहुलने नकार दिल्याचं समोर आलं. अखेर राहुलने ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर एकच रन काढला, जेणेकरून पुढच्या ओव्हरमध्ये कोहलीला पुन्हा स्ट्राइक मिळू शकेल.


हे सर्व सुरु असताना कोहली प्रत्येक वेळी सिंगल रन घेण्यासाठी पुढाकार घेताना दिसला. मात्र राहुल नकार देत होता. कोहलीला शतक पूर्ण करता यावं, हा त्यामागील राहुलचा हेतू होता. 


सामन्यानंतर के.एल राहुलने केला खुलासा


या सर्व गोष्टींचा खुलासा खुद्द के.एल राहुल केला आहे. सामन्यानंतर के.एल राहुल स्पष्ट केलं की, कोहलीची इच्छा होती की, कोणीही त्याच्यावर आरोप करू नये की, त्याने शतक पूर्ण करण्यासाठी सिंगल रन घेण्याचा प्रयत्न केला नाही. पण राहुलने त्याला समजावून सांगितलं की, अजून बरेच बॉल बाकी आहेत आणि टीम आरामात जिंकेल. 


राहुल सामन्यानंतर म्हणाला, "मी सिंगल घेण्यास नकार दिला होता. विराटने मला सांगितलं होतं की, सिंगल घेतला नाही तर वाईट दिसेल. लोक विचार करतील की, वैयक्तिक स्कोअरसाठी खेळतोय. पण त्यावेळी मी म्हटलं की आपण आरामात सामना जिंकतोय. तू तुझं शतक पूर्ण कर"