MS Dhoni: धोनीला `तो` नियम लागू होत नाही; वीरेंद्र सेहवागची कॅप्टन थालावर बोचरी टीका!
Mahendra Singh Dhoni: चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याच्यावर इम्पॅक्ट प्लेयर नियम (Impact Player Rule) का लागू होणार नाही. यावर वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) याने भाष्य केलंय.
Virender Sehwag On MS Dhoni: आयपीएलच्या फायनल दिवशी (IPL 2023 Final) पावसाने गोंधळ घातल्याने आता रिझर्व्ह दिवशी सामना खेळवला जात आहे. दोन्ही तगड्या संघात आता बाजी कोण मारणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. अशातच आता टीम इंडियाचा स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) याने मोठं वक्तव्य केलं आहे. चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) याच्यावर इम्पॅक्ट प्लेयर नियम (Impact Player Rule) का लागू होणार नाही. यावर त्याने भाष्य केलंय.
काय म्हणाला वीरेंद्र सेहवाग?
तुम्ही तंदुरुस्त असाल तर 40 व्या वर्षी क्रिकेट खेळणं अवघड नाही. एमएस धोनीने यावर्षी फारशी फलंदाजी केलेली नाही. त्याला त्याच्या गुडघ्याची दुखापत वाढवायची नाही. अनेकदा तो शेवटच्या दोन षटकांत यायचा. मला विचारालं तर इम्पॅक्ट प्लेयर नियम (Impact Player Rule) धोनीला लागू होत नाही, असं वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) म्हणाला आहे.
महेंद्रसिंह धोनीने (MS Dhoni) संपूर्ण हंगामात मिळून अधिक तर 40 ते 50 बॉल खेळले असतील. कमी बॉल खेळून त्याने चांगल्या धावा केल्यात, ही चांगली गोष्ट आहे. मात्र, त्याला इम्पॅक्ट खेळाडू म्हणता येणार नाही. तो केवळ त्याच्या नेतृत्वाच्या जोरावर संघात आहे. या एकाच कारणामुळे तो सर्व सामन्यांमध्ये खेळताना दिसला आहे, असं वक्तव्य वीरेंद्र सेहवागने (Virender Sehwag On MS Dhoni) केलंय.
जर तो कर्णधार नसेल तर तो प्रभावशाली खेळाडू म्हणूनही खेळणार नाही. इम्पॅक्ट खेळाडूचा नियम अशा व्यक्तीसाठी आहे जे फिल्डिंग करत नाही परंतु फलंदाजी करतो किंवा ज्या फलंदाजी करतात, मात्र गोलंदाजी करत नाही. धोनी या नियमात कुठंच बसत नाही, असंही वीरेंद्र सेहवाग म्हणाला आहे.
दरम्यान, अहमदाबादच्या मोदी स्टेडियमवर अखेर पावसाने उसंत घेतली असून आता सामन्याला सुरुवात झाली. चेन्नई सुपर किंग्जने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर आता शुभमन गिल आणि वृद्धीमान साहा यांनी गुजरातला आक्रमक सुरूवात करून दिलीये. शेवटचं वृत्त हाती आलं त्यावेळी गुजरातच्या 4 ओव्हरमध्ये 37 धावा झाल्या होत्या.