नवी दिल्ली :  पाकिस्तानात जन्मलेला दक्षिण आफ्रिकेचा स्टार लेग स्पिनर इमरान ताहीरसोबत बर्मिंघमच्या पाकिस्तानी वाणिज्य दूतावासाच्या कर्मचाऱ्यांनी गैरवर्तणूक केली.  या संदर्भात आरोप इमरानने ट्विट करून केले आहेतत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इमरान ताहीर आपल्या परिवारातील सदस्यांसाठी ४ सप्टेंबरला पाकिस्तानचा व्हिजा मिळविण्यासाठी गेला होता.  इमरान ताहीरला पाकिस्तान विरूद्धच्या तीन टी-२० मॅचच्या सिरीजसाठी वर्ल्ड इलेवनमध्ये सामील करण्यात आले आहे. 


इमरानने ट्विट करून या गैरवर्तणुकीबद्दल माहिती दिली आहे. यात त्याने म्हटले की, आज मी पाकिस्तानच्या वाणिज्य दूतावासात गेलो होतो. त्या ठिकाणी एक विचित्र घटना घडली. अनेक तास वाट पाहिल्यानंतर मला कर्मचाऱ्यांनी ऑफीसच्या बाहेर हाकलले. त्यांनी मला सांगितले की ऑफीस टायमिंग संपले आहे आणि दूतावास बंद करण्याची वेळ झाली आहे. 


 



ताहीरने सांगितले,  यानंतर आयबीएन ए अब्बास या हाय कमिशनरच्या आदेशानंतर आम्हांला व्हिजा मिळाला.  मी मूळचा पाकिस्तानचा दक्षिण आफ्रिकन क्रिकेटर आहे, माझी वर्ल्ड इलेवन संघात निवड झाली तरी मला इतक्या अडचणींना सामोरे जावे लागले. पण हाय कमिश्नरने आम्हांला या अडचणीतून वाचवले.