IND vs IRE Head To Head: 2 जूनपासून टी-20 वर्ल्डकपला सुरुवात झाली असून आज टीम इंडिया पहिला सामना खेळणार आहे. न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर टीम इंडिया विरूद्ध आयरलँड यांच्यात सामना रंगणार आहे. या सामन्यासाठी टीम इंडियाने पूर्ण तयारी केली आहे. या सामन्यात टीम इंडियाचा किंग विराट कोहलीचा देखील समावेश असणार आहे. याशिवाय संपूर्ण टीम मैदानावर घाम गाळतेय. रोहित शर्मा आणि कंपनी वर्ल्डकपची सुरुवात विजयाने करण्याचा प्रयत्न करणार आहे. यापूर्वी हेड टू हेड कसं आहे ते पाहूया. 


आयरलँडविरूद्ध टीम इंडियाचं पारडं जड


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीम इंडिया 2024 च्या टी 20 वर्ल्डकपची सुरुवात विजयाने करू शकतो. भारत आणि आयर्लंडमधील हेड टू हेड आकडे याची माहिती देतात. जेव्हा-जेव्हा दोन्ही टीम आंतरराष्ट्रीय T20 मध्ये भिडले आहेत, तेव्हा भारत जिंकला आहे. भारत आणि आयर्लंड टी-20 आंतरराष्ट्रीय स्पर्धेत आतापर्यंत 7 वेळा आमनेसामने आले आहेत. या सातही सामन्यांमध्ये टीम इंडियाने आयरलँडचा पराभव केला आहे. 


टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना 4 सामने आणि दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना 3 सामने जिंकले आहेत. T20 वर्ल्डकपमध्ये भारत आणि आयर्लंड आतापर्यंत एकदाच आमनेसामने आले आहेत. टी-20 वर्ल्डकप 2009 मध्ये टीम इंडियाचा सामना आयर्लंडशी झाला होता. त्यावेळी टीम इंडियाने हा सामना 8 विकेट्सने जिंकला आहे. 


टी-20 वर्ल्डकप 2024 साठी कशी आहे टीम इंडिया


रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या, यशस्वी जायसवाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, संजू सॅमसन, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंह, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज


टी-20 वर्ल्डकप 2024 साठी कशी आहे आयरलँडची टीम


पॉल स्टर्लिंग (कर्णधार), मार्क अडायर, रॉस अडायर, एंड्रयू बालबर्नी, कर्टिस कँपर, गॅरेथ डेलानी, जॉर्ज डॉकरेल, ग्राहम ह्यूम, जोश लिटिल, बॅरी मॅक्कार्थी, नील रॉक, हॅरी टेक्टर, लोर्कन टकर, बेन व्हाईट, क्रेग यंग