वेलिंग्टन : ऑस्ट्रेलिया दौऱ्यात मालिकावीर किताब पटकावलेला महेंद्रसिंह धोनी आता न्यूझीलंड दौऱ्यासाठी सज्ज झाला आहे. या दौऱ्यासाठी भारतीय संघ न्यूझीलंडमध्ये पोहोचला आहे. भारतीय संघ न्यूझीलंड विरुद्धात पाच एकदिवसीय तर तीन टी-२० सामने खेळणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

न्यूझीलंडच्या दौऱ्यावर धोनीला एक नवा विक्रम करण्याची संधी आहे. न्यूझीलंड मध्ये सर्वाधिक धावा करण्याऱ्या भारतीय खेळाडूचा विक्रम हा सचिन तेंडुलकरच्या नावे आहे. सचिन तेंडुलकरने न्यूझीलंडविरुद्ध १८ सामन्यांमध्ये ६५२ धावांचा रतीब घातला आहे. तर त्या खालोखाल दुसऱ्या क्रमांकावर विरेंद्र सेहवाग विराजमान आहे. सेहवागने १२ सामन्यांमध्ये ५९८ धावा केल्या आहेत. तेंडुलकर आणि सेहवाग यांच्यामध्ये केवळ ५४ धावांचे अंतर आहे. 


धोनीने आतापर्यंत न्यूझीलंड दौऱ्यावर १० एकदिवसीय सामन्यांमध्ये ४५६ धावा केल्या आहेत. या न्यूझीलंड दौऱ्यात भारताला एकूण पाच एकदिवसीय सामने खेळायचे आहेत. त्यामुळे धोनीला न्यूझीलंडमध्ये सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज हा मान मिळवण्याची पुरेपुर संधी आहे. धोनाला सेहवागला पिछाडीवर टाकण्यासाठी केवळ १४३ तर सचिनचा विक्रम मोडण्यासाठी फक्त १९७ धावांची आवश्यकता आहे.


धोनी सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धाच्या तिन्ही एकदिवसीय सामन्यांमध्ये अर्धशतकी खेळी केली आहे. त्यामुळे धोनीचा खेळ पाहता त्यातच्यासाठी पाच सामन्यांमध्ये १९७ धावा या जास्त नाहीत. ऑस्ट्रेलियाविरुद्धाच्या एकदिवसीय मालिकेमध्ये धोनीनं ३ सामन्यांमध्ये १९३ च्या सरासरीनं १९३ धावा केल्या. या कामगिरीबद्दल त्याला मालिकाविराचा किताब देऊन गौरवण्यात आलं.