COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : वर्ल्डकप २०१९ मध्ये भारतीय क्रिकेट टीमला नंबर-४ वर एका चांगल्या फलंदाजाची कमी भासत होती. टुर्नामेंटनंतर वेस्टइंडिज दौरा भारतसाठी खूप महत्वाचा आहे. आणि या दरम्यान निवड समितीला हे पाहणं महत्वाचं होतं की, शुभमन गिल (Shubman Gill) किंवा श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) या जागेवर फिट होऊ शकतात किंवा नाही? दोन्ही फलंदाज सध्या टीमइंडिया सोबत वेस्टइंडिज दौरा करत आहेत. 


गिलने मागील दोन मॅचमध्ये ६२ आणि ७७ रनांची डाव खेळला आहे तर, अय्यरने पहिल्या मॅचमध्ये ७७ आणि दुसऱ्या मॅच मध्ये ४७ रन केले आहेत. कर्णधार मनिष पांडे (Manish Pandey) याने गेल्या सामन्यात शतक पूर्ण केलं. परंतू त्याला पाचव्या किंवा सहाव्या क्रमांकावर बघितले जात आहे. 


नंबर-४ वर एक उत्कृष्ट फलंदाज मिळाला नसल्याने, कोच संजय बांगरला ही खूप काही ऐकावे लागत आहे. वेस्टइंडिज दौऱ्यासाठी भारतीय टीमची घोषणा रविवारी २१ जुलैला होईल.
   
यावेळी भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (BCCI) चे एक सीनियर अधिकारी म्हणाले की, मध्यक्रमात सतत केल्या जाणाऱ्या बदलांमुळे फक्त वर्ल्डकपमध्ये नाही, तर गेल्या कित्येक सिझनमध्ये टीम इंडियाला त्रास झाला आहे. अधिकारी म्हणाले, आम्हाला सतत संघर्ष करावा लागला. 


आम्ही खेळाडूंचे सतत समर्थन करतो, कारण एक खराब दिवसाच्या जागी, त्यांचे टुर्नामेंटमध्ये चांगले प्रदर्शन होते. परंतू भविष्याबद्दल कोणता निर्णय घेण्याआधी सपोर्ट स्टाफची समिक्षा केली जाईल. विजय शंकरचे जखमी होऊन टुर्नामेंटमधून बाहेर होण्याच्या एक दिवस आधी बांगर म्हणाले की, सगळे खेळाडू फिट आहेत. 


अधिकारी म्हणाले की, सपोर्ट स्टाफच्या प्रदर्शनाच्या समिक्षेत अनियमितता बघण्यात आली, कारण ज्या लोकांना याची जवाबदारी दिली होती, त्यांना हे हवे होते की, स्टाफचे काही लोक त्यांच्या पोझिशनला राहिले पाहिजे. 


वरिष्ठ कर्मचाऱ्यांसोबत सध्या कार्यरत असलेले प्रशासन क्रिकेटच्या सगळ्या निर्णयांना घेऊन गोंधळलेले होते, आणि क्रिकेट सहायक समिती (सीएसी) ने देखील दुर्लक्ष केले, ज्यात सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि वीवीएस लक्ष्मणसारखे खेळाडू आहेत. ही खूप लाजीरवाणी गोष्ट आहे.