SA vs BAN: बांगलादेशचा खेला होबे... बॉल बॉऊंड्रीला जाऊनही मोजले नाही 4 रन्स! अन् 4 धावांनीच झाला पराभव
T20 World Cup 2024 SA vs BAN: आफ्रिकेने बांगलादेशविरुद्ध टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात एकही सामना न गमावता आपले वर्चस्व कायम राखलंय. पण या सामन्यात एक घटना अशी घडली जेव्हा बॉल फोर मारल्यानंतरही अंपायरने चौकार दिला नाही. अखेरीस बांगलादेशला 4 रन्सने पराभव स्वीकारावा लागला.
T20 World Cup 2024 SA vs BAN: सोमवारी टी-20 वर्ल्डकपमध्ये दक्षिण आफ्रिका विरूद्ध बांगलादेश यांच्यात सामना रंगला होता. अटीतटीच्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने बांगलादेशावर 4 रन्सने मिळवला. न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये खेळलेल्या या सामन्यात मात्र अंपायरच्या एका निर्णयाने मोठा वाद होण्याची शक्यता आहे. आफ्रिकेने बांगलादेशविरुद्ध टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात एकही सामना न गमावता आपले वर्चस्व कायम राखलंय. पण या सामन्यात एक घटना अशी घडली जेव्हा बॉल फोर मारल्यानंतरही अंपायरने चौकार दिला नाही. अखेरीस बांगलादेशला 4 रन्सने पराभव स्वीकारावा लागला.
बांगलादेशासोबत झाली फसवणूक?
या घटनेनंतर आता प्रश्न असा उपस्थित होताना दिसतोय की, बांगलादेशसोबत फसवणूक झाली का? तर याचं उत्तर 'नाही' असं असणार आहे. कारण नियमानुसार, अंपायरने अगदी योग्य निर्णय दिला होता. हे संपूर्ण प्रकरण काय आहे ते पाहूया. एका चौकारानंतरही पंचांनी 4 रन्स का दिले नाहीत, हे समजून घेऊया.
बांगलादेश विरूद्ध दक्षिण आफ्रिका यांच्या दुसऱ्या डावात म्हणजे बांगलादेश धावांचा पाठलाग करत असताना आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज ओटनीएल बार्टमनने 17 व्या ओव्हरमध्ये दुसरा बॉल बांगलादेशचा फलंदाज महमुदुल्लाहला टाकला. हा बॉल महमुदुल्लाहच्या पॅडला लागला आणि मग थेट बाऊंड्री लाईनच्या पार गेला. मुळात या बॉलवर आऊटचं अपील करण्यात आलं होतं. ज्यावर महमुदुल्लाला मैदानी अंपायरने आऊट करार दिला.
यावेळी बांगलादेशी फलंदाजाने अंपायरच्या निर्णयानंतर रिव्ह्यूची मागणी केली. तर बॉल स्टंपला लागत नसल्याने तिसऱ्या अंपायरने त्याला नाबाद घोषित केलं. आता अनेकांचा प्रश्न आहे जर अंपायपने निर्णय बदलला तर बांगलादेशला लेग बायचे 4 रन्स मिळाले पाहिजे होते. मात्र बॉल सीमारेषा ओलांडल्यानंतरही अंपायरने लेग बायचे 4 रन्स दिले नव्हते.
बांगलादेशाला का मिळाले नाहीत 4 रन्स?
नियमानुसार, एकदा अंपायरने बॅट्समनला आऊट घोषित केल्यावर, अंपायरचा निर्णय रिव्ह्यूद्वारे बदलला तरी बॉल डेड होतो. त्यामुळे बांगलादेशला लेग बायचे 4 रन्स देता आले नाहीत. भारताचा माजी फलंदाज वसीम जाफरने X वर यावर पोस्ट केली आहे. त्याने हाच नियम अधोरेखित केलाय आहे. यावेळी जाफरने म्हटलंय की, एकदा फलंदाजाला आऊट दिल्यावर बॉल डेड होतो, त्यामुळे बांगलादेशला लेग बाय देण्यात आलं नाही.