Ind vs Pak : `रिझर्व्ह डे` ला सामना पूर्ण झाला नाही तर...? कोणती टीम जाणार फायनलमध्ये? पाहा संपूर्ण Equation
Ind vs Pak : पावसाच्या व्यत्ययामुळे हा सामना रिझर्व्ह डे म्हणजे 11 सप्टेंबर रोजी खेळवण्यात येणार आहे. यावेळी टीम इंडियाने 24.1 ओव्हर्समध्ये 2 विकेट्स गमावून 147 रन्स केले. मात्र जर रिझर्व्ह डे च्या दिवशीही हा सामना रद्द झाला तर कोणती टीम फायनल गाठणार हा प्रश्न चाहत्यांच्या मनात आहे.
Ind vs Pak : रविवारी कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियममध्ये भारत विरूद्ध पाकिस्तान ( India vs Pakistan ) यांच्यात सामना खेळवण्यात आला. दरम्यान पावसाच्या व्यत्ययामुळे हा सामना रिझर्व्ह डे म्हणजे 11 सप्टेंबर रोजी खेळवण्यात येणार आहे. यावेळी टीम इंडियाने 24.1 ओव्हर्समध्ये 2 विकेट्स गमावून 147 रन्स केले. मात्र जर रिझर्व्ह डे च्या दिवशीही हा सामना रद्द झाला तर कोणती टीम फायनल गाठणार हा प्रश्न चाहत्यांच्या मनात आहे.
भारत विरूद्ध पाकिस्तान सामन्यामध्ये पाकिस्तानच्या ( India vs Pakistan ) टीमने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय टीम इंडियासाठी फायदेशीर ठरला. भारताने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना चांगली सुरुवात केली. शुभमन गिल आणि रोहित शर्माने ( Rohit sharma ) पाकिस्तानच्या गोलंदाजांची यथेच्छ धुलाई केली. अर्धशतकानंतर गिल आणि रोहितची विकेट गेली. यानंतर केएल राहुल आणि विराट कोहली क्रिझवर खेळत असताना पावसाने खोडा घातला.
पाकिस्तानविरूद्धच्या ( India vs Pakistan ) सामन्यात पावसाच्या व्यत्ययामुळे खेळ थांबवण्यात आला. सततच्या पावसामुळे सामना रिझर्व्ह डे पर्यंत वाढवण्यात आला. या सामन्याचा निकाल आता आज म्हणजेच 1 सप्टेंबरला लागण्याची शक्यता आहे. हे दोन्ही संघ पुन्हा एकदा आर प्रेमदासा स्टेडियमवर आमनेसामने येणार आहेत. मात्र यावेळीही चाहत्यांसाठी एक मोठी बातमी आहे. पावसाची अपडेट पाहता राखीव दिवशीही सामना पूर्ण होण्याची शक्यता नाही.
सोमवारी उर्वरीत सामना होणार सुरु होणार आहे. म्हणजेच हा सामना त्याच ठिकाणाहून सुरू होईल जिथे पावसामुळे थांबला होता. टीम इंडियाचा ओपनर रोहित शर्माच्या ( Rohit sharma ) नेतृत्वाखालील टीम इंडियाने टॉस गमावून प्रथम फलंदाजी करताना 24.1 ओव्हर्समध्ये 2 विकेट्स गमावून 147 रन्स केले. सध्या फलंदाजीसाठी केएल. राहुल आणि विराट कोहली क्रिझवर असून रिझर्व्ह डे ला देखील हे दोन खेळाडू उतरणार आहेत.
सोमवारही सामना नाही झाला तर...
11 सप्टेंबरला सामना पूर्ण होऊ शकला नाही, तर पुढे काय होणार? असा प्रश्न काही चाहत्यांच्या मनात आहे. सामना पूर्ण झाला नाही तर भारत-पाकिस्तान ( India vs Pakistan ) टीम्सना पॉईंट्स वाटून देण्यात येणार आहे. यानुसार दोन्ही टीम्सना प्रत्येकी 1 गुण मिळेल.
सध्या पॉईंट्स टेबलमध्ये पाकिस्तान आणि श्रीलंकेचे प्रत्येकी एका विजयाने प्रत्येकी 2 पॉईंट्स आहेत. मात्र नेट रनरेट उत्तम असल्याने पाकिस्तान अव्वल आहे. यावेळी सामना रद्द झाल्याने जर पाकिस्तानला एक पॉईंट मिळाला तर पाकिस्तानचे 3 पॉईंट्स होतील. यावेळी भारताचे 1 पॉईंट्स आणि श्रीलंकेचे 2 पॉईंट्स असणार आहे. भारताला अजूनही 12 सप्टेंबरला श्रीलंका आणि 15 सप्टेंबरला बांगलादेशशी सामना करायचा आहे. अशा परिस्थितीत टीम इंडियाला पुढचा प्रत्येक सामना जिंकावाच लागणार आहे.