IND vs AUS ICC U19 World Cup Final In Marathi: दक्षिण आफ्रिकेत अंडर-19 वर्ल्ड स्पर्धेच्या अंतिम सामन्यांसाठी अवघे काही तास उरले आहेत. भारत सहव्यांदा, तर ऑस्ट्रेलिया तिसऱ्यांदा अंडर 19 विजेतेपदाची संधी आहे. अंडर 19 वर्ल्ड कप 2024 चा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS ) यांच्यात होणार असून पुन्हा एकदा 140 कोटी भारतीयांचे लक्ष्य भारतच्या विजयाकडे लागलं आहे.  वर्ल्ड कप 2023 मध्ये कांगारूंकडून भारताचा पराभव झाल्यानंतर रोहित शर्मा, विराट कोहली आणि शमी, के एल राहुल या सगळ्यांचा वचपा काढण्यासाठी आज उदयसेना मैदानात उतरणार आहे. कारण वनडे वर्ल्डकपमध्ये स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात लढत झाली होती. हा सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला होता. त्यामुळे कोट्यावधी भारतीय क्रिकेट प्रेमींचं स्वप्न भंगलं होतं. त्यामुळे त्या पराभवाची कसड अंडर 19 वर्ल्डकप काढण्याची संधी आज भारताकडे आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ICC अंडर-19 पुरुष विश्वचषक 2024 च्या अंतिम फेरीत आज, विल्मूर पार्क, बेनोनी येथे भारतीय संघाचा सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. भारताने पहिल्या उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत अंतिम सामन्यात स्थान निश्चित केले असते. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा 1 विकेटने पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला असता.  आश्चर्याची गोष्ट ही की, वर्षभरात तिसऱ्यांदा भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अंतिम सामना होणार आहे. याआधीच्या दोन सामन्यांमध्ये भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. तसेच भारताचा सामना 7 ते 11 जून दरम्यान लंडनमधील 'द ओव्हल' येथे WTC फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाशी झाला होता.  त्या सामन्यात भारतीय संघाला 209 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. 


दरम्यान, अंडर-19 वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत भारतीय संघ आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही संघ आत्तापर्यंत आमनेसामने आले आहेत. मात्र, दोन्ही वेळा भारतीय संघाने चांगल्या पद्धतीने विजय मिळवला आहे. तिसऱ्या फेरीतच अंतिम फेरीत दोन संघटनांमध्ये टक्कर होणार आहे. भारतीय संघाने इंग्लंडला पराभूत करुन गेल्या  विश्वचषक विजेतेपदाचा मान मिळवा आहे. 


कर्णधार उदय सहारन जबरदस्त फॉर्मात


अंडर-19 विश्वचषक 2024 मध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत उदय सहारन अव्वल स्थानावर आहे. आजपर्यंत एकूण 6 सामन्यांत 389 धावा केल्या आहेत.  या कालावधीत एक शतक आणि तीन अर्धशतके झळकावली आहेत. उदय सहारन मधल्या फळीत फलंदाजीला येतो आणि आपली जबाबदारी चोखपणे पार पाडतो. उदयनम केलीने आयर्लंडविरुद्ध 75 धावा करत शानदार खेळ केला. अंतिम फेरीत त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 81 धावा केल्या. त्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या महाअंतिम फेरीत उदय कांगारू धूळ चारणार हे निश्चित आहे.


मुशीर खानकडे महत्त्वाची जबाबदारी 


उपांत्य फेरीत मुशीरला विशेष काही करता आले नाही. तो अवघ्या 4 धावा करुन बाद झाला. मुशीरने 6 सामन्यांत 338 धावा टाकल्या आहेत. 
दोन्ही संघातील खेळाडू


भारत अंडर-19 :- आदर्श सिंग, अर्शीन कुलकर्णी, मुशीर खान, उदय सहारन (कर्णधार), प्रियांशू मोलिया, सचिन धस, अरावेली अवनीश (विकेटकीपर), मुरुगन अभिषेक, राज लिंबानी, नमन तिवारी आणि सौम्या पांडे.


ऑस्ट्रेलिया अंडर-19:- हॅरी डिक्सन, सॅम कॉन्स्टास, ह्यू वॅबगेन (कर्णधार), हरजुस सिंग, रायन हिक्स (यष्टीरक्षक), टॉम कॅम्पबेल, ऑलिव्हर पीक, राल्फ मॅकमिलन, टॉम स्ट्रेकर, महाली बेर्डमन आणि कॅलम विडलर.