IND vs AFG: बंगळूरूमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा, दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये भारताचा विजय
IND vs AFG 3rd T20: सुपर ओव्हरमध्येही पुन्हा एकदा रोहित शर्माने कमाल दाखवत विजय खेचून आणला. या विजयासह टीम इंडियाने 3 सामन्यांच्या टी-20 सिरीजमध्ये अफगाणिस्तानला क्लिन स्विप दिला आहे.
IND vs AFG 3rd T20: शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेल्या या सामन्यात टीम इंडियाने अखेर अफगाणिस्तानवर विजय मिळवला आहे. तिसरा टी-20 सामना सुपर ओव्हरपर्यंत रंगला होता. यावेळी पहिली सुपर ओव्हर देखील टाय झाली. यानंतर नियमांनुसार, पुन्हा एकदा सुपर ओव्हर खेळवण्यात आली. अखेरीस या सामन्यात भारताने अफगाणिस्तानचा पराभव केला आहे. सुपर ओव्हरमध्येही पुन्हा एकदा रोहित शर्माने कमाल दाखवत विजय खेचून आणला. या विजयासह टीम इंडियाने 3 सामन्यांच्या टी-20 सिरीजमध्ये अफगाणिस्तानला क्लिन स्विप दिला आहे.
दोन वेळा खेळवली सुपर ओव्हर
बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सिरीजमध्ये या तिसऱ्या टी-20 सामन्यात रोहित शर्माचे नाबाद शतक आणि रिंकू सिंग (नाबाद 69) सोबतच्या 190 धावांच्या भागीदारीमुळे भारताने 4 गडी गमावून 212 रन्स केले. यानंतर अफगाणिस्तानच्या टीमने 6 विकेट्स गमावून 212 रन्स केले. यानंतर पहिल्या सुपर ओव्हरमध्ये दोन्ही टीम्सने 16-16 रन केले. यानंतर दुसरी सुपर ओव्हर खेळवण्यात आली. ज्यामध्ये टीम इंडियाने विजय मिळवला.
रोहित शर्माने सावरला डाव
रोहितने या सिरीजमध्ये प्रथमच खातं उघडलं. तिसर्या सामन्यात त्याने 7व्या चेंडूवर एक रन घेत त्याने फलंदाजीला सुरुवात केली. यापूर्वी त्याने आपल्या बॅटने फोरही मारली होती. पण अंपायर वीरेंद्र शर्मा यांनी त्याला लेग बाय फोर घोषित केलं होतं. या सामन्यात रोहित शर्माने शानदार नाबाद शतक झळकावलं. रोहितने उत्तम कमबॅक करत 21 रन्सची खेळी केली. पहिल्या दोन सामन्यात रोहित शर्माला एकही रन करता आला नव्हता. त्यामुळे या सामन्यात रोहितकडून चांगल्या खेळीची अपेक्षा होती. अखेर रोहित शर्माने चाहत्यांच्या अपेक्षा पूर्ण केल्या.