INDvsAUS : आगामी  T-20 World Cup पुर्वी भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन संघात टी -ट्वेंटी सामना खेळवला जात आहे. मोहालीच्या मैदानावर पहिला टी-ट्वेंटी सामना खेळला गेला. या सामन्यात भारताचा दारूण पराभव झाला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघासाठी ही मालिका म्हणजे वर्ल्ड कपसाठीची लिटमस टेस्ट असेल. मात्र, पहिल्याच सामन्यात भारताला पराभवाला सामोरं जावं लागलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सर्वप्रथम टॉस जिंकून ऑस्ट्रेलियाने भारताला फलंदाजीसाठी आमंत्रण दिलं. पहिल्या डावात भारतीय संघाने 208 धावा केल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक धावा हार्दिक पांड्याने केल्या. तर के एल राहुलने देखील 35 बॉलमध्ये धुंवाधार फलंदाजी 55 धावा केल्या. त्य़ाचबरोबर सुर्यकुमारने देखील 4 षटकांच्या जोरावर 46 धावांची खेळी केली.
 
भारताने दिलेल्या 209 धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची सुरूवात चांगली झाली. कॅमरन ग्रीनने धुवाधार फलंदाजी करत 30 चेंडूत 61 धावा खेचल्या. तर अखेरीस मॅथ्यू वेडने 21 चेंडूत 45 धावा करत भारताचा विजय खेचून घेतला. पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतचा 4 गडी राखुन पराभव केला आहे.


दरम्यान, काही खेळाडूंचा अपवाद वगळता आगामी T-20 World Cup साठी भारताचा संघ हाच असले. त्यामुळे हा संघ वर्ल्डकप जिंकून देणार का ?, असा सवाल उपस्थित केला जातोय.