IND vs AUS T20 : आगामी  T-20 World Cup पुर्वी भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन संघात टी -ट्वेंटी (IND vs AUS 1st T20) सामना खेळवला जात आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघासाठी ही मालिका म्हणजे वर्ल्ड कपसाठीची लिटमस टेस्ट असेल. भारतीय संघाला आशिया कपमध्ये पराभवाचा सामना करावा लागला असला तरी आता भारतीय संघाने जोरदार पुनरागमन केल्याचं पहायला मिळतंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघात मोहालीमध्ये पहिला टी-ट्वेंटी सामना खेळला जात आहे. या सामन्यात हार्दिक पांड्याने (hardik Pandya) ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांची धुलाई केली. हार्दिक पांड्याने फक्त 30 बॉलमध्ये 71 धावांची वादळी खेळी केली. या डावात त्याने 7 चौकार तर 5 चचनगुंबी षटकार देखील खेचले आहेत.


सर्वप्रथम टॉस जिंकल्यावर ऑस्ट्रेलियाने भारताला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. मात्र, कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) फेल ठरले. रोहित शर्माने 11 धावा तर विराटने फक्त 2 धावा केल्या. मात्र, उपकर्णधार राहुल आणि सुर्यकुमार यादवने डाव सांभाळला. राहुलच्या विकेटनंतर मैदानात आलेल्या हार्दिक पांड्याने ऑस्ट्रेलियन बॉलरचा घाम फोडला.


पहिल्या डावात भारतीय संघाने 208 धावा केल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक धावा हार्दिक पांड्याने केल्या. तर के एल राहुलने देखील 35 बॉलमध्ये धुंवाधार फलंदाजी 55 धावा केल्या. त्य़ाचबरोबर सुर्यकुमारने देखील 4 षटकांच्या जोरावर 46 धावांची खेळी केली.