IND VS AUS 1st Test 2nd Day : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India VS Australia) यांच्यात शुक्रवार पासून बॉर्डर गावसकर ट्रॉफीला (Border Gavaskar Trophy) सुरुवात झाली असून आज शनिवारी पर्थ टेस्ट सामन्याचा दुसरा दिवस पार पडला. पहिल्या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी टीम इंडियाच्या (Team India) गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाला 104  धावांवर ऑल आउट केलं तर त्यानंतर फलंदाजीत राहुल आणि जयस्वाल यांनी मैदानात कहर करून टीम इंडियाची आघाडी 200 पार पोहोचवली. यासह या जोडीने सलामी फलंदाज म्हणून इतिहास रचला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पर्थ टेस्टच्या पहिल्या दिवशी टीम इंडियाचा कर्णधार जसप्रीत बुमराह याने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. यात टीम इंडिया150 धावांवर ऑलआउट झाली, तर पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी उत्तम गोलंदाजी करून ऑस्ट्रेलियाला भारताने 104 धावांवर रोखले. यावेळी टीम इंडियाच्या गोलंदाजांपैकी पदार्पणाचा सामना खेळणाऱ्या हर्षित राणाने ऑस्ट्रेलियाच्या 3 विकेट्स घेतल्या तर कर्णधार बुमराहने 5 खेळाडूंच्या विकेट्स घेऊन त्यांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले.  तर मोहम्मद सिराजने एकूण 2 विकेट्स घेतल्या. टीम इंडियाच्या फलंदाजीची दुसरी इनिंग सुरु झाल्यावर सलामी फलंदाज केएल राहुल आणि यशस्वी जयस्वाल ऑस्ट्रेलियन गोलंदाजांवर तुटून पडले. यावेळी केएल राहुलने दिवस अखेरपर्यंत 62 धावा तर यशस्वी जयस्वालने 90 धावा केल्या. त्यामुळे दुसऱ्या दिवसाअंती टीम इंडिया 218 धावांनी आघाडीवर आहे. 


हेही वाचा : IPL 2025 मेगा ऑक्शनची वेळ बदलली, फ्रीमध्ये कधी आणि कुठे पाहता येणार?


 


जसप्रीत बुमराहने घेतल्या 5 विकेट्स : 


जसप्रीत बुमराहने 5 विकेट घेतल्याची टेस्ट क्रिकेटमधील त्याची ही 11 वी वेळ आहे.  जसप्रीत बुमराहने ऑस्ट्रेलियाविरुद्ध पर्थ येथे खेळल्या जात असलेल्या पहिल्या टेस्ट सामन्याच्या पहिल्या इनिंगमध्ये आतापर्यंत 13 ओव्हर्स टाकल्या तर 23 धावांत 5 विकेट्स घेतल्या. जसप्रीत बुमराहने आतापर्यंत 41 टेस्ट सामन्यांच्या 78 इनिंगमध्ये भारताकडून 178 बळी घेतले आहेत. या काळात जसप्रीत बुमराहने तब्बल 11 वेळा इनिंगमध्ये 5 विकेट्स घेतल्या आहेत.


राहुल आणि जयस्वालने रचला इतिहास : 



केएल राहुल आणि यशस्वी जयस्वाल या दोघांनी दुसऱ्या दिवशी फलंदाजी करताना नाबाद 172 धावा केल्या. यासह ऑस्ट्रेलियात 100 पेक्षा अधिक धावांची पार्टनरशिप करणारे राहुल आणि जयस्वाल ही भारताची मागील 20 वर्षातील पहिली सलामी जोडी ठरली आहे. यशस्वी जयस्वाल पहिल्या इनिंगमध्ये शुन्यावर बाद ठरला होता, मात्र दुसऱ्या इनिंगमध्ये तो मैदानात टिकून खेळला आणि त्याने 193 बॉलमध्ये 90 धावा केल्या. यात 7 चौकार आणि 2 षटकार लगावले. तर 153 बॉलमध्ये त्याने 62 धावा केल्या. दरम्यान त्याने 4 चौकार लगावले.