IND vs AUS 2nd ODI: भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना आज (19 मार्च) विशाखापट्टणम (Visakhapatnam) येथे खेळवला जाणार आहे. भारतीय संघाने पहिला सामना पाच गडी राखून जिंकला होता. आता हा सामना जिंकून मालिकेवर कब्जा करण्याची त्याच्याकडे सुवर्णसंधी आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता हा सामना खेळवला जाईल. मात्र या सामन्यादरम्यान पावसाची शक्यता असून सामना सुरू असताना हवामान साफ असेल पण सायंकाळच्यावेळी हवामानात बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS 2nd ODI) यांच्यात आतापर्यंत एकूण 144 एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. ऑस्ट्रेलियाने यापैकी 80 सामने जिंकले आहेत तर भारताने केवळ 54 सामने जिंकले आहेत. तसेच भारतात दोघांमधील संघर्ष बरोबरीचा झाला आहे. भारतामध्ये दोन्ही संघांमध्ये एकूण 65 एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. ऑस्ट्रेलिया संघाने भारतात 30 एकदिवसीय सामने जिंकले आहेत तर टीम इंडियाला 30 सामने जिंकण्यात यश आले आहे. आता दुसऱ्या एकदिवसीय सामन्यातील हवामानाचा अंदाज सामना खराब करण्याची शक्यता आहे. 


वाचा: ना पंत ना संजू, 'हा' खेळाडू असेल टीम इंडियाचा विकेटकीपर; Ravi Shastri यांची मोठी भविष्यवाणी


विशाखापट्टणमने आतापर्यंत भारताच्या 9 सामन्यांचे आयोजन केले आहे. ज्यामध्ये टीम इंडियाने (team India) 7 सामने जिंकले आहेत तर एकदा पराभव झाला. तर डिसेंबर 2019 मध्ये येथे शेवटचा एकदिवसीय सामना खेळला गेला तेव्हा भारताने वेस्ट इंडिजविरुद्ध 387/5 धावा केल्या होत्या. आज मात्र विशाखापट्टणममध्ये दिवसभर पावसाची शक्यता आहे. दिवसभर वातावरण ढगाळ राहील आणि हवामान थंड राहण्याचा अंदाज आहे. विशाखापट्टणममध्ये ताशी 13 किमी वेगाने वाऱ्याचा वेग अपेक्षित आहे. येथील आर्द्रता 79 टक्क्यांपर्यंत राहण्याचा अंदाज आहे. सायंकाळी 3 ते 5 दरम्यान पावसाची शक्यता आहे.


दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात सर्वांच्या नजरा टीम इंडियाच्या प्लेइंग-11 (ind vs aus 2nd odi playing 11) वर असेल. कर्णधार रोहित शर्मा (rohit sharma) दुसऱ्या एकदिवसीय सामन्यासाठी संघात सामील झाल्यामुळे भारतीय संघाच्या प्लेइंग-11 मध्ये बदल होणे निश्चितच आहे. रोहित पहिल्या सामन्यात कौटुंबिक कारणांमुळे खेळू शकला नाही आणि त्याच्या अनुपस्थितीत हार्दिक पांड्याने संघाची धुरा सांभाळली. रोहित प्लेइंग-11 मध्ये इशान किशन किंवा सूर्यकुमार यादवची जागा घेऊ शकतो.


विशाखापट्टणममधील हवामानाचा अंदाज (Weather forecast in Visakhapatnam)


  • कमाल तापमान: 26°C

  • किमान तापमान: 23 °C

  • पावसाची शक्यता: 80 %

  • ढगाळ: 76%

  • वाऱ्याचा वेग: 32 किमी/ता