नागपूर : टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियातील (IND vs AUS) तीन टी20 मालिकेतील दुसरा टी20 सामना आज शुक्रवारी नागपुरात खेळवला जात आहे. या सामन्याआधीच पाऊस पडल्याने टॉस पुढे ढकलला होता. 6.30 चा टॉस 7 वाजता होणार असल्याची माहीती देण्यात आली होती.मात्र आता 7 वाजता देखील टॉस होऊ शकला नाही आहे. त्यामुळे दोनदा टॉस होऊ न शकल्याने या सामन्या संदर्भातली मोठी अपडेट समोर आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुसऱ्या टी20 सामन्याचा टॉस 6.30 वाजता होणार होता. मात्र ओल्या आऊटफिल्डमुळे 6.30 वाजता होणारे नियोजित टॉस पुढे ढकलण्यात आला होता. यावेळी 7 वाजता अंपायर्सने मैदानाची पाहणी करून टॉस होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र त्यानंतरही मैदान पूर्णपणे कोरडे होऊ शकले नसल्याने टॉसचा वेळ पुन्हा पुढे ढकलण्यात आला होता. 


आताची ताजी बातमी अशी आहे की ओल्या आउटफिल्डमुळे टॉसला आणखी विलंब होणार आहे. आता अंपायर्स 8 वाजता मैदानाची पाहणी करणार आहेत. त्यामुळे आता तरी सामना होणार की सामना रद्द होणार याकडे क्रिकेट फॅन्सचे लक्ष लागले आहे.  


या सामन्यात रोहित शर्माच्या (Rohit sharma) नेतृत्वाखाली टीम इंडिया विजयाच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे. सध्या मालिकेत ऑस्ट्रेलिया 0-1 ने आघाडी घेतली आहे. त्यामुळे टीम इंडिया (Team India) देखील विजय मिळवून आघाडी घेण्याच्या प्रयत्नात असणार आहे. 


संभाव्य प्लेइंग इलेव्हन
टीम इंडिया :  रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक (डब्ल्यूके), अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, हर्षल पटेल/दीपक चहर, भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराह


ऑस्ट्रेलिया : अ‍ॅरॉन फिंच (कर्णधार), शॉन अ‍ॅबॉट, अ‍ॅश्टन अगर, पॅट कमिन्स, टिम डेव्हिड, नॅथन एलिस, कॅमेरॉन ग्रीन, जोश हेझलवूड, जोश इंग्लिस, ग्लेन मॅक्सवेल, केन रिचर्डसन, डॅनियल सॅम्स, स्टीव्ह स्मिथ, मॅथ्यू वेड, अ‍ॅडम झम्पा.