नागपूर : टीम इंडियाने दुसऱ्या टी 20 सामन्यात ऑस्ट्रेलियावर (IND vs AUS 2ND T20) 6 विकेट्सने दणदणीत विजय मिळवलाय. या विजयासह टीम इंडियाने 3 सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला विजयासाठी 9 ओव्हरमध्ये 91 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र टीम इंडियाने हे आव्हान 5 विकेट्सच्या मोबदल्यात 8 ओव्हरमध्येच पूर्ण केलं. कॅप्टन रोहित शर्माने (Rohit Sharma) 46 धावांची नाबाद खेळी केली. तर दिनेश कार्तिकने (Dinesh Karthik) शेवटच्या 2 बॉलवर सिक्स आणि फोर मारत भारताला विजय मिळवून दिला.  (ind vs aus 2nd t20i team india win 6 wickets against australia in do ior die match at vca nagpur dinesh karthik give finishing touch)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्याआधी टीम इंडियाने टॉस जिंकला. ऑस्ट्रेलियाला बॅटिंगसाठी भाग पाडलं. पावसाच्या व्यत्ययामुळे सामना 8 ओव्हर्स खेळवण्यात आला. ऑस्ट्रेलियाने 8 ओव्हर्समध्ये 5 विकेट्स गमावून 90 धावा केल्या. 


ऑस्ट्रेलियाकडून मॅथ्यू वेडने सर्वाधिक नाबाद 43 धावा केल्या. तर कॅप्टन एरॉन फिंचने 31 रन्स जोडल्या. टीम इंडियाकडून अक्षर पटेलने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. तर बुमराहने एक विकेट घेतली.


मालिका बरोबरीत 


दरम्यान या विजयासह टीम इंडयाने 3 सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली आहे. या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना हा 25 सप्टेंबरला हैदराबादमधील राजीव गांधी स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. 



 प्लेइंग इलेव्हन :


ऑस्ट्रेलिया : एरोन फिंच (कॅप्टन), कॅमरन ग्रीन, स्टीवन स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, सीन एबॉट, टीम डेविड, मॅथ्यू वेड (विकेटकीपर), पॅट कमिन्स, डेनियल सॅम्स, एडम झॅम्पा आणि जोश हेझलवुड.


टीम इंडिया :  रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, हर्षल पटेल, जसप्रीत बुमराह आणि युजवेंद्र चहल.