IND vs AUS 2nd Test, David Warner : बॉर्डर गावस्कर ट्रॉफीतील नागपूर कसोटीत टीम इंडियाने (Team India) ऑस्ट्रेलियाविरुद्ध एक डाव आणि 132 धावांनी विजय मिळवला. या विजयासह टीम इंडियाने मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. आता दुसऱ्या टेस्ट सामन्याची क्रिकेट फॅन्सला उत्सुकता लागली आहे. या दुसऱ्या टेस्ट सामन्यातून ऑस्ट्रेलियाचा स्टार खेळाडू बाहेर होण्याची शक्यता आहे. या खेळाडूमूळे टीम इंडियाला (Team India) मोठा दिलासा मिळणार आहे. 


प्लेईंग इलेव्हनमध्ये बदल


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीम इंडिया (Team India) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्यातील दुसरा कसोटी सामना 17 ते 21 फेब्रुवारी दरम्यान नवी दिल्लीतील अरुण जटेली स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या कसोटी सामन्यासाठी ऑस्ट्रेलिया (Australia) त्यांच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये मोठे बदल करण्याची शक्यता आहे. या बदलाचा टीम इंडियाला मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.  


स्टार खेळाडू बाहेर


टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना दिल्लीच्या अरुण जटेली स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या कसोटीसाठी ऑस्ट्रेलियन संघ त्यांच्या प्लेइंग-इलेव्हनमध्ये काही मोठे बदल करून उतरू शकतो. ऑस्ट्रेलियन (Australia) संघाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर (David Warner) दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळण्याबाबत अजूनही शंका आहे. त्यामु्ळे तो दुसऱ्या कसोटीत प्लेईंग इलेव्हनमधून बाहेर होण्याची शक्यता आहे. 


पहिल्या कसोटीत फ्लॉप


नागपूर कसोटीतील पहिल्या डावात वॉर्नर (David Warner) अवघ्या 1 धावा करून बाद झाला, तर दुसऱ्या डावात त्याला केवळ 10 धावा करता आल्या होत्या. अशा स्थितीत वॉर्नरला दुसऱ्या कसोटीत प्लेइंग-इलेव्हनमध्ये स्थान मिळणे कठीण आहे. दुसऱ्या कसोटीत वॉर्नरला संधी मिळाली नाही, तर त्याच्या जागी ट्रॅव्हिस हेडला संधी दिली जाऊ शकते.


तीन फिरकिपटू 


ऑस्ट्रेलियन संघ दिल्लीतील दुसऱ्या कसोटीत तीन फिरकीपटूंसोबत जाण्याचा विचार करू शकतो. यामध्ये मिच स्वीपसनच्या जागी मॅट कुहनेमनचा समावेश करणार असल्याचे वृत्त सिडनी मॉर्निंग हेराल्डने दिले आहे. विशेष म्हणजे, पहिल्या कसोटीत कांगारू संघ फक्त दोन फिरकीपटूंसह उतरला होता, ते दोन फिरकी गोलंदाज होते नॅथन लियॉन आणि टॉड मर्फी. टॉडने पदार्पणाच्या सामन्यात एकूण 7 विकेट घेतल्या होत्या.


दरम्यान 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेत टीम इंडिया 1-0 ने आघाडीवर आहे. आता दुसरा टेस्ट सामना कोण जिंकतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.