IND Vs AUS 2nd Test: भारत आणि ऑस्ट्रेलिया (Ind vs Aus 2nd test) यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळवली जात आहे. आज सामन्याचा तिसरा दिवस असून दुसरे सत्र सुरू आहे. भारताला विजयासाठी 115 धावांचे लक्ष्य मिळाले आहे. प्रत्युत्तरात टीम इंडियाने (team India) 2 विकेट गमावत 50 धावा केल्या आहेत. दरम्यान दिल्ली कसोटीत टीम इंडियाचा (Team India) स्टार फलंदाजी विराट कोहलीने अद्भुत कामगिरी केली असून आंतरराष्ट्रीय क्रिकेट 25,000 धावा करणारा विराट कोहली (virat kohali) जगातील सहावा फलंदाज ठरला आहे. महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) आणि सौरव गांगुली (Sourav Ganguly ) सारखे दिग्गज देखील त्यांच्या संपूर्ण आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीत हा विक्रम करू शकले नाहीत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून पहिल्या डावात 263 धावा केल्या. या सामन्यात टीम इंडियाचा (Team India) स्टार फलंदाजी विराट कोहलीने (Virat Kohli) त्याच्या नावावर एक अनोखा विक्रम केला आहे. आतापर्यंत हा विक्रम मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या (Sachin Tendulkar) नावावर होता. मात्र विराट कोहलीने सचिन तेंडूलकरला मागे टाकत जगातील सहावा सक्रिय फलंदाज ठरला आहे.   



 पहिल्या कसोटी सामन्यात विराट कोहली जोशात दिसला नाही. पहिल्या डावात त्याने केवळ 12 धावा केल्या. तो लवकरच टॉड मर्फीला बळी पडला. दुसऱ्या कसोटीत कोहलीने 52 धावा केल्या. मात्र आजच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात 25,000 धावा पूर्ण करणारा कोहली जगातील सहावा सक्रिय फलंदाज ठरला आहे.



दरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात कमी डावांत ( Innings) मध्ये 25 हजार धावा पूर्ण करणारा फलंदाज विराट कोहली ठरला. त्याने महान फलंदाज सचिन तेंडुलकचा विक्रम मोडला. विराटने 549 डावांत हा टप्पा ओलांडला. तर सचिनला 577 डाव खेळावे लागले होते. शिवाय वयाच्या 34 पर्यंत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांत विराट दुसऱ्या स्थानावर पोहोचला. त्याने रिकी पाँटिंगचा 24193 धावांचा विक्रम मोडला.  


दिल्ली टेस्टमध्ये विराटच्या विकेटवरुन वाद


दिल्ली कसोटीच्या पहिल्या इनिंगमध्ये विराट कोहली 44 धावा करुन बाद झाला. यासाठी त्याने 84 चेंडुंचा सामना केला आणि 4 चौकार लगावले. कुनह्रॅनच्या गोलंदाजीवर तो एलबीडब्ल्यू झाला. पण विराटच्या विकेटवरुन नवा वाद निर्माण झाला आहे. कुनह्नॅनच्या पहिला चेंडू विराटच्या पॅडवर आदळला. अंपायरने त्याला बाद दिल्यानंतर विराटने रिव्ह्यू घेतला. पण थर्ड अंपायरनेही बादचा निर्णय कायम ठेवला. व्हिडिओमध्ये चेंडू बॅटची कड लागून पॅडवर आदळल्याचं स्पष्ट दिसत आहे.