मुंबई : टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील तिसरा आणि निर्णायक सामना हा रविवारी 25 सप्टेंबरला खेळवण्यात येणार आहे. दोन्ही संघांनी 3 सामन्यांच्या मालिकेत प्रत्येकी 1 विजय मिळवला आहे. त्यामुळे मालिका सध्या 1-1 अशी बरोबरीत आहे. त्यामुळे आता तिसरा आणि अंतिम सामना  (IND vs AUS 3 rd Odi) हा रंगतदार होणार आहे. या निर्णायक सामन्यासाठी (Team India) टीम इंडिया प्लेइंग इलेव्हनमध्ये काही बदल करु शकते. (ind vs aus 3rd and final match team india predicted playing 11 rohit sharma virat kohli yuzvendra chahal at rajiv gandhi international stadium hyderabad)


टीम इंडियाची हैदराबादमधील कामगिरी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हैदराबादमधील राजीव गांधी स्टेडियममध्ये या तिसऱ्या सामन्याचं आयोजन करण्यात आलं आहे. टीम इंडिया आतापर्यंत हैदराबादमध्ये अजिंक्य राहिली आहे.


टीम इंडियाने 6 डिसेंबर 2019 ला विंडिज विरुद्ध हा सामना खेळला होता. या सामन्यात टीम इंडियाने 209 धावा केल्या होत्या. या आकड्यावरुन हैदराबादची खेळपट्टी ही फलंदाजांसाठी अनुकूल असल्याचं नमूद होतं.


विराट-केएलकडून मोठ्या अपेक्षा


विराट कोहली आणि केएल राहुल या जोडीकडून तिसऱ्या सामन्यात मोठ्या अपेक्षा असणार आहे. कारण, या तिघांनी विंडिज विरुद्ध 2019 ला झालेल्या सामन्यात दुसऱ्या विकेटसाठी 100 धावांची भागीदारी केली होती. उल्लेखनीय बाब म्हणजे या जोडीच्या नावावर हैदराबादमध्ये सर्वात मोठ्या पार्टनरशीपचा रेकॉर्ड आहे. 


विराटने तेव्हा एकूण नाबाद 94 धावांची खेळी केली होती. तर केएलनेही 62 रन्सची शानदार इनिंग साकारली. त्यामुळे या दोघांकडून अशाच कामगिरीच अपेक्षा असणार आहे. 


चहल चमत्कार करणार?


चहलने विंडिज विरुद्ध झालेल्या 2019च्या सामन्यात टीम इंडियाकडून सर्वाधिक विकेट्स घेतल्या होत्या. चहलने तेव्हा 4 ओव्हर्समध्ये 36 धावा देत 2 फलंदाजांना माघारी पाठवलं होतं. त्यामुळे आताही चहलने अशीच कामगिरी करावी, अशी अपेक्षा टीम मॅनेजमेंटला असणार आहे. 


ऑस्ट्रेलिया सीरीजसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कॅप्टन), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, आर. अश्विन, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, हर्षल पटेल, दीपक चाहर आणि जसप्रीत बुमराह.


तिसऱ्या सामन्यासाठी संभावित प्लेइंग इलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सू्र्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, रवि बिश्नोई, अक्षर पटेल आणि दीपक चाहर.