IND VS AUS 4th Test : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India VS Australia) यांच्यात 5 सामन्यांची बॉर्डर गावस्कर टेस्ट (Border Gavaskar Trophy) सीरिज खेळवली जात असून यातील चौथा सामना 26 डिसेंबर पासून मेलबर्न येथे सुरु आहे. मेलबर्न टेस्टचा पहिला दिवस हा ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी गाजवला. बॉक्सिंग टेस्टच्या पहिल्या दिवशी 86 ओव्हर्स झाल्या असून यात प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने 6 विकेट्स गमावून 311 धावा केल्या. तर भारताकडून सर्वाधिक 3 विकेट्स स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह याने घेतल्या.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मेलबर्न टेस्ट सामन्याचा टॉस ऑस्ट्रेलियाचा फलंदाज पॅट कमिन्सने जिंकला. त्याने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेत टीम इंडियाला गोलंदाजीचे आव्हान दिले. सुरुवातीपासूनच ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी मैदानात जम बसवत धडाकेबाज कामगिरीला सुरुवात केली. ऑस्ट्रेलियाच्या सुरुवातीच्या चारही फलंदाजांनी अर्धशतकीय कामगिरी केली. यात सॅम कोंस्टसने 60, उस्मान ख्वाजाने 57, लोबूशेनने 72 धावा तर स्टीव्ह स्मिथने नाबाद 68 धावा केल्या. ॲलेक्स कॅरीने 31 धावा केल्या. तर पॅट कमिन्स आणि मिचेल मार्श दोन अंकी धाव संख्या करू शकले नाहीत.  


जसप्रीत बुमराहने घेतल्या 3 विकेट्स : 


टीम इंडियाकडून गोलंदाज जसप्रीत बुमराहने 3 विकेट्स घेतल्या. त्याने घेतलेल्या विकेट्समध्ये उस्मान ख्वाजा, ट्रेव्हिस हेड, मिचेल मार्श यांचा समावेश होता. तर आकाश दीप रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदरला प्रत्येकी एक विकेट मिळाली. 


हेही वाचा : विराट कोहलीवर ICC करणार कारवाई? ऑस्ट्रेलियन खेळाडूला धक्का मारणं महागात पडणार, घातली जाणार बंदी?


 


सीरिज 1-1 अशा बरोबरीत : 


भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टेस्ट सीरिजमध्ये आतापर्यंत तीन सामने झाले असून यातील पर्थ येथे झालेला पहिला सामना हा भारताने जिंकला तर दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने बाजी मारली. तर गाबा येथे झालेला तिसरा सामना ड्रॉ झाला. सध्या बॉर्डर गावसकर ट्रॉफी सीरिज 1-1 अशा बरोबरीत आहे. सध्या WTC Final चं समीकरण पाहिलं तर टीम इंडियाला ऑस्ट्रेलिया विरुद्ध बॉर्डर गावस्कर ट्रॉफी टेस्ट सीरिज जिंकावी लागेल. सध्या टेस्ट सीरिज 1-1 अशा बरोबरीत आहे. परंतु जर टीम इंडियाने 3-1 अशा फरकाने ही सीरिज जिंकली तर ते थेट WTC फायनलसाठी क्वालिफाय होतील. पण जर हीच सीरिज 2-2 वर ड्रॉ झाली तर टीम इंडियाला दुसऱ्या संघांच्या परफॉर्मन्सवर अवलंबून राहावं लागेल. 


भारतीय संघाची प्लेईंग 11 : 


यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, आकाश दीप