IND VS AUS 4th Test : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India VS Australia) यांच्यात मेलबर्न येथे झालेल्या पहिल्या सामन्याच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष होते. WTC फायनलमध्ये स्वबळावर पोहोचण्यासाठी टीम इंडियाला (Team India) हा सामना जिंकणं महत्वाचं होतं. परंतु मेलबर्न टेस्टमध्ये टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियाने तब्बल 184 धावांनी पराभव केला ज्यामुळे टेस्ट सीरिजमध्ये ऑस्ट्रेलियाने 1-2 अशी आघाडी घेतली. टीम इंडियाला धावांची आवश्यकता असताना कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) मोठी कामगिरी करू शकला नाही. तसेच न्यूझीलंड टेस्ट पासून सतत समाधानकारक धावा करण्यात अपयशी ठरल्यामुळे रोहित सध्या ट्रॉलर्सच्या निशाण्यावर आहे. अशातच आता माजी क्रिकेटर इरफान पठाण याने देखील रोहितच्या फॉर्मबाबत मोठं वक्तव्य केलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बॉर्डर गावसकर ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात रोहित शर्मा कौटुंबिक कारणामुळे अनुपस्थितीत राहिला. सीरिजमधील तीन सामन्यांमध्ये कर्णधार रोहितच्या बॅटमधून फक्त 31 धावा निघाल्या. माजी ऑल राऊंडर इरफान पठाणने रोहित शर्माच्या संघातील स्थितीबाबत चिंता व्यक्त केली. मेलबर्न टेस्टमध्ये झालेल्या भारताच्या दारुण पराभवानंतर इरफान पठाण म्हणाला की रोहित शर्मा कर्णधार आहे म्हणून अन्यथा त्याचा बॅटिंग फॉर्म पाहता त्याला प्लेईंग 11 मध्ये स्थान देण्यात आले नसते. 


हेही वाचा : सॅम कोस्टासने टेस्टच्या शेवटच्या दिवशी विराटला डिवचलं! मैदानात काय केलं पाहा Video


रोहितला प्लेईंग 11 मध्ये स्थान दिलं नसतं : 


इरफान पठाणने स्टार स्पोर्ट्सवर बोलताना म्हटले की, "एक खेळाडू ज्याने जवळपास 20 हजार धावा केल्या आहेत. ज्याप्रकारे रोहित सध्या संघर्ष करतोय, असं वाटतं कि त्याचा फॉर्म त्याची साथ देत नाहीये. सध्या तो कर्णधार आहे म्हणून खेळतोय. जर तो कर्णधार नसता तर तो आता खेळत नसता. तुमच्याकडे सेट टीम असती ज्यात टॉपवर केएल राहुल खेळत असता, जयस्वाल असता, शुभमन गिल फलंदाजीसाठी आला असता. जर तुम्ही सध्याचा फॉर्म पाहाल तर ज्याप्रकारे रोहित फलंदाजी करताना संघर्ष करतोय, कदाचित त्याला प्लेईंग 11 मध्ये स्थान मिळाले नसते". 


WTC फायनलमध्ये पोहोचणं अजूनही शक्य?


मेलबर्न टेस्टमध्ये पराभूत झाल्याने WTC पॉईंट्स टेबलमध्ये टीम इंडिया तिसऱ्याच स्थानी आहे, परंतु त्यांची विजयाची टक्केवारी 55.88 वरून 52.78 पर्यंत कमी झाली आहे. तर ऑस्ट्रेलिया दुसऱ्या क्रमांकावर असून त्यांच्या विजयाची टक्केवारी 61.46 इतकी आहे. तर पहिल्या क्रमांकावर असणारी साऊथ आफ्रिका ही यापूर्वीच WTC फायनलसाठी क्वालिफाय झालीये. परंतु असं असलं तरी टीम इंडिया WTC फायनलच्या शर्यतीतून पूर्णपणे बाहेर पडलेली नाही. टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहोचण्यासाठी श्रीलंकेवर अवलंबून राहावे लागेल आणि श्रीलंकेने ऑस्ट्रेलियाला दोन सामन्यांच्या मालिकेत पराभूत करावे यासाठी प्रार्थना करावी लागेल. 


मेलबर्न टेस्ट गमावल्यामुळे बॉर्डर गावस्कर ट्रॉफी टेस्ट सीरिज सध्या 1-2 अशा बरोबरीत आहे. सिडनी येथे बॉर्डर गावस्कर ट्रॉफी टेस्ट सीरिजचा शेवटचा सामना हा 3 ते 7  जानेवारी रोजी होणार आहे. तेव्हा सिडनी टेस्ट सामना टीम इंडियाला काहीही करून जिंकावा लागेल असे झाल्यास बॉर्डर गावसकर टेस्ट सीरिज 2-2 अशा बरोबरीत येईल आणि WTC पॉईंट्स टेबलमध्ये भारताच्या विजयाची टक्केवारी 55.26% पर्यंत पोहोचू शकले.